Year Ender 2024 : गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; 'ही' टॉप 10 यादी एकदा पाहाच

Year Ender 2024 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दरवर्षी गुगल वर्षभरात कोणत्या गोष्टी सर्च झाल्या या संदर्भातील अहवाल जारी करतं. या अहवालामध्ये सामान्यपणे जगभरामध्ये तसेच वेगवेगळ्या देशांमधील लोक नेमकं काय सर्च करतात? कशासंदर्भात सर्च करतात? कोणते प्रश्न गुगल वर सर्च करतात? याबद्दलची माहिती दिली जाते तर भारतात यावर्षी म्हणजे 2024 मध्ये कोणते चित्रपट सगळ्यात सर्च झाले याविषयी जाणून घेऊया...

| Dec 11, 2024, 15:48 PM IST
1/10

स्त्री 2

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री' या चित्रपटांनं प्रेक्षकांना जी क्रेझ लावली होती. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यंदाच्या वर्षाक सगळ्यात जास्त कोणत्या चित्रपटाविषयी गुगलवर सर्च करण्यात आलं आहे तर तो हाच चित्रपट आहे. त्या यादीत पहिल्या क्रमांकावर 'स्त्री 2' नं बाजी मारली आहे. 

2/10

कल्कि 2898 AD

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे 'कल्कि 2898 AD' या चित्रपटानं बाजी मारली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. तर त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, दिशा पटानी, दुलकर सलमान आणि खलनायकाच्या भूमिकेत कमल हासन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

3/10

12th Fail

'12 वी फेल' या विक्रांत मेसीच्या या चित्रपटानं तिसरं स्थान पटकावलं आहे. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असून हा सत्य घटनेवर आधारीत आहे.   

4/10

लापता लेडिज

आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी आणि चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांच्या या चित्रपटानं 'लापता लेडिज' प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचं नाव हे ऑस्कर नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आलं आहे. 

5/10

हनुमान

'हनुमान' या तेलगू चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 40 कोटी बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं 300 कोटींची कमाई केली. हा चित्रपट भारतात सगळ्यात जास्त सर्च केलेल्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. 

6/10

महाराजा

विजय सेतुपतीच्या 'महाराजा' या चित्रपटानं 2024 च्या टॉप सर्चमध्ये सहावं स्थान पटकावलं आहे. या चित्रपटाच्या पटकथेनं सगळ्यांना खिळवून सोडलं होतं. 

7/10

मंजुमल बॉइज

'मंजुमल बॉइज' या चित्रपटाची पटकथे ही अनपेक्षीत अशी आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर तुम्ही पाहू शकतात. या चित्रपटानं गुगल सर्चच्या यादीत 7 वं स्थान पटाकवलं आहे. 

8/10

ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम

विजय थलपतीच्या 'गोट' अर्थात 'ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या चित्रपटानं गुगल सर्चमध्ये 8 वं स्थान मिळवलं आहे. या चित्रपटात विजयचा डबल रोल आहे. 

9/10

सलार

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या 'सलार' या चित्रपटात दोन खास मित्र जेव्हा शत्रू होतात तेव्हा काय होतं, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे. तर या चित्रपटानं गुगल सर्चमध्ये 9 वं स्थान मिळवलं आहे. 

10/10

आवेशम

फहाद फासिलच्या 'आवेशम' या गाण्यानं सगळ्यांच वेड लावलं होतं. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.