Xiaomi चा अतरंगी डिझाईनवाला स्मार्टफोन, बाजारात एकच हवा! फिचर्स तर विचारूच नका...
Nov 09, 2022, 00:22 AM IST
1/5
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चीनमध्ये Xiaomi 13 मालिका लॉन्च करणार होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या भारतीय बाजारात सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 13 Pro ची डिसाईन पाहून अनेकांना राहवेनासं झालंय.
2/5
OnLeaks (स्टीव्ह हेमरस्टोफर) ने Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 चे CAD रेंडर शेअर करण्यासाठी Zoutons आणि Compare Dial सोबत काम केलंय. Xiaomi 13 Pro आणि Xiaomi 13 बद्दल सविस्तर जाणून घेऊया...
TRENDING NOW
photos
3/5
Xiaomi 13 CAD रेंडर्समध्ये असं दिसून येतंय की यात फ्लॅट AMOLED डिस्प्ले दिलेला आहे. डिव्हाइस फ्लॅट एज डिझाइनला प्राधान्य देत असल्याचं पाहिलं जातंय. दुसरीकडे, Xiaomi 13 Pro मध्ये गोलाकार किनार असलेला AMOLED डिस्प्ले दिसतोय.
4/5
Xiaomi 13 आमि Xiaomi 13 pro च्या वरच्या कोपऱ्यात चार डॉट्स दिसून येतात. त्यामध्ये दोन मायक्रोफोन आणि एक IR ब्लास्टर असल्याचं दिसंतय. या फोनमध्ये एक सिम स्लॉट, एक माइक्रोफोन, एक यूएसबी-सी पोर्ट आणि एक स्पीकर दिसतोय.
5/5
Xiaomi 13 आमि Xiaomi 13 pro फोनला व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण देखील दिसत आहेत. Xiaomi 13 आणि 13 Pro या दोन्हींमध्ये मागील बाजूस एक प्रमुख कॅमेरा बंप आहे. दोन्ही उपकरणांमध्ये एलईडी फ्लॅश युनिटसह ट्रिपल कॅमेरा युनिट आहे.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.