World Autism Awareness Day : ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये लक्षणे कशी ओळखायची...
World Autism Awareness Day 2023: आज 'जागतिक ऑटिझम अव्हेरनेस डे' आहे. तेव्हा आज जाणून घेऊया की या डिसॉर्डरची लक्षणं (Autism Symptoms) कोणती आहेत? आणि त्यावर तुम्ही कसे उपचार करू शकता? पालकांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
World Autism Awareness Day 2023: ऑटिझममध्ये लहान मुलांच्या मेंदूची वाढ (What is Autism) नीट होत नाही. त्यामुळे त्यांच्यात थोडी विसंगती निर्माण होते. यामुळे त्यांना इतरांशी संपर्क साधण्यास आणि व्यक्त होण्यात अडथळे येतात आणि त्यामुळे त्यांना अनेक नव्या गोष्टी शिकायलाही (What are the Autism Symptoms) अडचण येते. तेव्हा आज 2 एप्रिल म्हणजे 'जागतिक ऑटिझम अव्हेयरस डे' (World Autism Awareness Day 2023) आहे. तेव्हा जाणून घेऊया याची लक्षणे आणि उपचार!