‘या’ लोकांनी बिलकुल खाऊ नये चपाती! प्रत्येकाच्या आरोग्यासाठी नाही फायदेशीर

भारतीयांची जेवण हे चपाती किंवा पोळीशिवाय अपूर्ण असतं. दुपारच जेवण असो किंवा रात्रीच जेवणच ताटात चपाती असायला हवीच. चपाती ही सगळ्यांचा आरोग्यासाठी फायदेशीर नसते. 

नेहा चौधरी | Feb 12, 2025, 23:04 PM IST
1/7

पोळी किंवा चपाती आरोग्यासाठी फायदेशीर असली तरी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ती हानिकारक आहे. कारण गव्हात कार्बोहायड्रेट्स असतात. जर तुम्ही दोन्ही जेवणात चपातीच सेवन केल्यास तुमच्या रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.   

2/7

मधुमेहाच्या रुग्णांनी गव्हाची चपाती चुकून खाऊ नये. कारण गव्हाची चपाती खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. भारतातील बहुतेक लोक दिवसातून जवळजवळ तीन वेळा गव्हाच्या पिठाची रोटी, पोळी, चपाती किंवा पराठा खातात. 

3/7

सेलिआक रोग असलेल्या लोकांना ग्लूटेन खाल्ल्याने रोगप्रतिकारक प्रतिक्रिया येते. या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी गव्हाची चपाती खाऊ नये.

4/7

ज्या लोकांना पोटात गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असल्यास या लोकांनी चुकूनही खाऊ नये.

5/7

अल्सर असलेल्या लोकांना पोट, आतडे किंवा अन्ननलिकेतील आतील आवरणावर फोड येतात, ज्यांना अल्सर म्हणतात. ज्यांना ही समस्या आहे त्यांनी गव्हाची चपाती खाऊ नये. इतर ग्लूटेनयुक्त पदार्थ, विशेषतः रिफाइंड पिठापासून बनवलेले पदार्थ या लोकांनी टाळावेत. 

6/7

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर या लोकांनी चपाती बिलकुल खाली नाही पाहिजे. या लोकांनी काही दिवसांच्या अंतराने दुपारच्या जेवणा एक छोटा फुलका खाऊ शकता.   

7/7

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)