अप्सरेपेक्षा कमी सुंदर नाहीत पाकिस्तानच्या कलाशमधील तरुणी; परपुरुष आवडताच मोडतात लग्न, दरवर्षी पार पडतो ‘हा’ सोहळा

Pakistan Trible women Kalash: आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या कलाशबद्दल सांगणार आहेत. येथील महिला त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. गोरा रंग आणि निळे डोळे असणाऱ्या या तरुणी अप्सरांनाही मागे टाकतील. त्यांच्या या सौंदर्याचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घ्या.  

| Oct 21, 2024, 20:07 PM IST

Pakistan Trible women Kalash: आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या कलाशबद्दल सांगणार आहेत. येथील महिला त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. गोरा रंग आणि निळे डोळे असणाऱ्या या तरुणी अप्सरांनाही मागे टाकतील. त्यांच्या या सौंदर्याचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घ्या.

 

1/12

Pakistan Trible women Kalash: आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या कलाशबद्दल सांगणार आहेत. येथील महिला त्यांच्या सौंदर्यासाठी ओळखल्या जातात. गोरा रंग आणि निळे डोळे असणाऱ्या या तरुणी अप्सरांनाही मागे टाकतील. त्यांच्या या सौंदर्याचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घ्या.  

2/12

तुम्ही पाकिस्तानमधील कलाशबद्दल ऐकलं आहे का? पाकिस्तानात राहणाऱ्या या समुदायाला कलाशी म्हटलं जातं. येथे राहणाऱ्या सुंदर महिलांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या महिला दिसण्यात एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाहीत.   

3/12

गोरा रंग आणि निळे डोळे, चेहऱ्यावरची चमक पाहून कोणीही त्यांच्यावर भाळेल. त्यांना पाहिल्यानंतर साहजिकपणे तुमच्याही मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील. यानिमित्ताने आज त्यांच्या सौंदर्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.   

4/12

कलाश, ज्याला कलश आणि कैलाशदेखील म्हणतात, हा हिंदुकुश पर्वतरांग किंवा पाकिस्तानच्या चित्राल जिल्ह्यातील एक समुदाय आहे. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार त्यांची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, संपूर्ण पाकिस्तानमध्ये इथल्या महिला सर्वात सुंदर आहेत.  

5/12

येथेली महिलांचे सौंदर्य अप्सरांसारखे आहे हे अगदी खरं आहे. संपूर्ण पाकिस्तानात ओळखल्या जाणाऱ्या इथल्या महिला आणि मुलींची खास गोष्ट म्हणजे त्या कधीही चेहरा झाकत नाहीत. येथे प्रत्येक मुलीचा रंग अतिशय गोरा आणि निळे डोळे आहेत.   

6/12

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने एका अभ्यासात असं लिहिले आहे की, 'आनुवंशिक संबंध डोळ्यांच्या रंगाशी संबंधित इंफॉर्मेटिव सिंगल न्यूक्लियोटाइड पॉलिमर फिल्म्सच्या आधारे केलेल्या अभ्यासातून सार्डिनिया आणि कलश यांच्यातील अनुवांशिक संबंधाचे प्रतिध्वनी करतात. उदाहरणार्थ, कलाशी आणि युरोपियन लोकांचा रंग हलका आणि निळे डोळे आहेत.  

7/12

खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील चित्राल खोऱ्यातील बांबुरेट, बिरीर आणि रंबूर भागात कलाशी समुदाय राहतो. हा समुदाय हिंदुकुश पर्वतांनी वेढलेला आहे आणि या पर्वत रांगेने वेढलेला असल्यामुळे आपली सभ्यता आणि संस्कृती सुरक्षित आहे असे मानतात. या पर्वताचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, जसे की या भागात अलेक्झांडरच्या विजयानंतर या पर्वताला कौकाशोष इंडीकौश असे म्हणतात. ग्रीक भाषेत याचा अर्थ हिंदुस्थानी पर्वत असा होतो. ते अलेक्झांडर द ग्रेटचे वंशज देखील मानले जातात.  

8/12

2018 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानच्या जनगणनेत यांचा स्वतंत्र जमात म्हणून समावेश करण्यात आला. या गणनेनुसार एकूण 3,800 लोक या समुदायात समाविष्ट आहेत. इथले लोक माती, लाकूड आणि मातीपासून बनवलेल्या छोट्या घरात राहतात आणि कोणत्याही सणाच्या दिवशी स्त्री-पुरुष एकत्र दारू पितात.   

9/12

या जमातीत संगीत प्रत्येक प्रसंगाला खास बनवते. उत्सवात बासरी आणि ढोल वाजवताना ते गातात आणि नाचतात. तथापि, बहुसंख्य अफगाण आणि पाकिस्तानी लोकांच्या भीतीमुळे ते अशा प्रसंगी पारंपरिक शस्त्रे तसेच आधुनिक तोफाही सोबत ठेवतात.  

10/12

कलशा जमातीत, घरासाठी कमाईचे बहुतेक काम स्त्रियाच करतात. त्या शेळ्या-मेंढ्या चरायला डोंगरावर जातात. घरी पर्स आणि रंगीबेरंगी हार बनवतात, जे पुरुष विकतात. इथल्या महिलांना पेहराव करायला खूप आवडतं. ते डोक्यावर विशिष्ट प्रकारची टोपी आणि गळ्यात दगडांच्या रंगीबेरंगी माळा घालतात.  

11/12

येथे वर्षभर Camos, Joshi आणि Uchaw हे तीन उत्सव होतात. यापैकी Camos हा डिसेंबरमध्ये साजरा होणारा सर्वात मोठा सण मानला जातो. हा प्रसंग आहे जेव्हा स्त्रिया, पुरुष आणि मुले आणि मुली एकमेकांना भेटतात. या काळात अनेक लोक नात्यात अडकतात. तथापि, या जमातीचे लोक संबंधांबद्दल इतके खुले आहेत की जर महिलांना दुसरा पुरुष आवडत असेल तर त्या त्याच्याबरोबर राहू शकतात.  

12/12

पाकिस्तानसारख्या देशात, जिथे स्त्रियांना स्वातंत्र्य नाही आणि सतत फतवे काढतात तया तुलनेत येथे महिलांना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते त्यांचा नवरा निवडतात आणि एकत्र राहतात. पण जर ते त्यांच्या वैवाहिक जोडीदारासोबत आनंदी नसतील आणि त्यांना दुसरे कोणी आवडत असेल, तर ते गोंधळ न घालता दुस-यासोबत जाऊ शकतात.