टॉयलेटच्या बाहेर का लिहिलेलं असतं WC? तुम्हाला माहिती आहे का कारण?

Toilet WC : शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही शौचालयांचा वापर करत असाल. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या टॉयलेटमध्ये WC असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण तुम्हाला याचा अर्थ माहितीये का? 

Pooja Pawar | Feb 11, 2025, 15:59 PM IST

 

 

1/7

आपण दैनंदिन जीवनात टॉयलेटचा विविध नावाने उल्लेख करतो. साधारणपणे याला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट किंवा रेस्ट रूम सारख्या शब्दांचा वापर केला जातो. परंतु काही टॉयलेटच्या बाहेर WC असं लिहिलं जातं. 

2/7

WC हा बाथरूम किंवा टॉयलेटचा शॉर्ट फॉर्म नाही. मग सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर WC असं का लिहिलं जातं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? 

3/7

बाथरूमचा उल्लेख करताना आपण इतर नावं देखील वापरतो. आणि WC हे सुद्धा बाथरूमचच एक नाव आहे. WC हा एका नावाचा शॉर्ट फॉर्म आहे.   

4/7

WC चा फुल फॉर्म हा 'वॉटर क्लोसेट' असा आहे. वॉटर क्लोसेट म्हणजे पाणी असणार शौचालय किंवा स्नानगृह.   

5/7

1900 च्या शतकात बाथरूमला 'वॉटर क्लोसेट' असं म्हटलं जायचं, नंतर त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखू जाऊ लागलं. 

6/7

जर एखाद्या टॉयलेटच्या बाहेर WC लिहिलेलं नसेल तर तेथे पाण्याची व्यवस्था नसल्याची शक्यता अधिक असते.   

7/7

ज्या बाथरूम बाहेर WC असं लिहिलेलं असतं अशा ठिकाणी टॉयलेटमध्ये वॉश बेसिन सुद्धा दिलेली असते. त्यामुळे बाथरूमला वॉटर क्लोसेटही म्हणतात.  सार्वजनिक शौचालयांबाहेर WC लिहिलेलं तुम्ही पाहू शकता.