Breakfast का करु नये Skip? फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही कधीही चुकवणार नाही नाश्ता

Why You Should Not Skip Breakfast: अनेक जण सकाळी नाश्ता करण्यावर भर देतात. मात्र, काही जण नाश्ता करण्याचे टाळतात. त्यांनी असं करणं टाळले पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं की, 'तुमचं शरीर तुम्ही जे खातो त्याचा आरसा असतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात सकस आहाराने करणं योग्य ठरतं. अनेकवेळा आपण शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यासाठी घाईघाईत नाश्ता करणे सोडून देतो. परंतु ही सवय योग्य नाही. त्यामुळे पोषणाची कमतरता होऊ शकते आणि शरीर अशक्त वाटू लागते. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स (Nikhil Vats) यांनी आपल्यासाठी नाश्ता करणं का महत्त्वाचं आहे हे सांगितलं.

Surendra Gangan | Dec 30, 2022, 15:47 PM IST
1/5

रात्री आपण झोपतो. सकाळी उठतो. यादरम्यान, आपला उपवास होतो. आपल्या शरीराला सकाळी सर्वात प्रथम जीवनसत्त्वे आणि खनिजांची आवश्यकता असते आणि नाश्ता वगळल्याने आपल्या शरीराला हानी पोहोचते. न्याहारीमध्ये प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले डाएट घ्या.

2/5

जर तुम्ही योग्यवेळी नाश्ता केला तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे डायबिटीजसारख्या  (Diabetes Control)जटिल आजारांचा धोका कमी होतो. नाश्त्यात गोड पदार्थ खाण्याचे शक्यतो टाळा.

3/5

जेव्हा तुम्ही नाश्ता टाळता तेव्हा दुपारच्या जेवणात जास्त खाण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे कॅलरीज वाढतात. दुसरीकडे, जरी तुम्ही हलका नाश्ता केला तरी तुमचे पोट भरलेले असेल आणि तुम्ही दुपारी मर्यादित प्रमाणात जेवण कराल.

4/5

काही कामामुळे तुम्ही नाश्ता केला नाही तर तुमचा मूड चांगला राहू शकत नाही. खरं तर, नाश्ता न केल्याने मेंदूचे कार्य योग्यरित्या काम करत नाही, ज्यामुळे तुम्हाला लवकरच राग येऊ शकतो.

5/5

जे लोक वजन कमी करण्याचा किंवा कायम राहण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी नियमित अंतराने अन्न खाणे आवश्यक आहे, एक जेवण आणि दुसऱ्या जेवणात जास्त अंतर असल्यास लठ्ठपणा येऊ शकतो, त्यामुळे नाश्ता करा.   (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)