PHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!

Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.

Oct 08, 2024, 16:20 PM IST

Morning Weakness Causes: दिवसाची सुरूवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. पण जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहत नाही. खरं तर रात्रीची 7 ते 8 तास झोप आपल्या शरीराला आराम देण्यासाठी पुरेशी असते. असं असलं तरी अनेक लोकांना 7-8 तास झोप होत असूनही सकाळी खूप थकवा जाणवतो. जसं की रात्री ते झोपलेच नाहीत. आज ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक त्यासोबत असं होत असल्याचं सांगतात. पण यामुळे आपल्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत यामागील कारण आणि यावरचे उपाय समजून घेणे गरजेचे आहे. 

1/8

1. झोपची गुणवत्ता

तुम्ही फक्त किती वेळ झोपता एवढेच महत्त्वाचे नसते, तर झोपेची गुणवत्ताही महत्त्वाची असते. जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल किंवा तुम्हाला गाढ झोप येत नसेल तर तुम्हाला सकाळी थकवा जाणवू शकतो. उपाय- यावर उपाय म्हणून तुम्ही झोपण्यापूर्वी कमी वेळ स्क्रीन बघा किंवा शक्य असल्यास झोपताना मोबाईल बघणं टाळा. 

2/8

2. झोपेची अनियमित वेळ

जर तुम्ही रोजची झोपण्याची वेळ ठरलेली नसेल तर त्याचा तुमच्या शरीराच्या जैविक घड्याळावर परिणाम होतो. अनियमित वेळेमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ताही खराब होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो.  उपाय- दररोज एकाच वेळी झोपण्याचा आणि उठण्याचा प्रयत्न करा. 

3/8

3. तणाव आणि चिंता

दिवसभरातील चिंता आणि तणावाचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल तर तुम्हाला गाढ झोप लागण्यात समस्या येऊ शकते. उपाय- यावर उपाय म्हणून ध्यान, योग किंवा दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायाम करून तुम्ही तणाव कमी करू शकता.

4/8

4. चुकीची जीवनशैली

तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी चुकीच्या असतील, फार शारीरिक हालचाल होत नसेल, बैठे काम असेल याबरोबरच कॅफिनच्या जास्त सेवनामुळेही थकवा येऊ शकतो.  उपाय- संतुलित आहार घ्या. ज्यामध्ये फळं, भाज्या आणि प्रथिनं यांचा समावेश असेल. तसंच नियमित व्यायाम करा.

5/8

5. झोपेच्या आधी जड जेवण करणं

रात्री जड अन्न खाल्ल्यानं पचन प्रक्रियेला वेळ लागतो. त्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि तुम्हाला सकाळी थकल्यासारखं वाटतं. उपाय- असं होऊ नये म्हणून झोपण्याच्या २-३ तास ​​आधी हलकं अन्न खावं. 

6/8

6. झोपेसाठी पुरक वातावरण नसणं

तुमच्या झोपण्याच्या स्थितीचा तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. जर तुम्ही झोपता त्या खोलीत आवाज किंवा प्रकाश असेल तर झोपेमध्ये व्यत्यय येऊन तुमची झोप नीट होणार नाही.  उपाय- तुमची झोपण्याची जागा शांत आणि अंधारमय ठेवा. जर आजूबाजूला खूप आवाज असेल तर कानात कापसाचे बोळे आणि प्रकाशासाठी डोळ्यांवर पट्टी ठेवा.

7/8

7. शारीरिक हालचालींचा अभाव

शारीरिक हालचालींच्या अभावामुळे शरीर सुस्त होते आणि याचा परिणाम तुमच्या झोपोवर होऊ शकतो उपाय- दररोज किमान 30 मिनिट शारीरिक हालचाली करा. जसं की चालणं, धावणं किंवा योगासनं करणं.

8/8

8. वैद्यकीय स्थिती

थायरॉईड, अशक्तपणा, झोपे संबंधीत समस्या यासारख्या काही वैद्यकीय परिस्थितींमुळेही थकवा येऊ शकतो. उपाय- झोपेची ही समस्या कायम राहिल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)