WhatsApp Tricks:डिलीट झालेले मेसेज कसे वाचायचे? डेटा कसा वाचवायचा?

तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेला मेसज वाचता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या अशा काही मजेदार ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Mar 17, 2024, 14:25 PM IST

WhatsApp Tricks:तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेला मेसज वाचता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या अशा काही मजेदार ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया. 

1/7

WhatsApp Tricks:डिलीट मेसेज कसे वाचायचे? डेटा कसा वाचवायचा?

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

आजच्या काळात, सोशल मीडिया ॲप्सपैकी जवळजवळ प्रत्येकजण व्हॉट्सॲप वापरतो. यामध्ये सतत नवनवे अपडेट येत असल्याने युजर्ससाठी हे आणखी सोपे होते. पण अॅप अपडेट होताना तुमच्या फोनचा बॅटरी बॅकअप आणि डेटा देखील वापरला जातो. हे तुम्हाला माहिती आहे का?

2/7

डिलीट केलेला मेसज

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेला मेसज वाचता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या अशा काही मजेदार ट्रिक्सबद्दल जाणून घेऊया. ज्यामुळे तुम्ही डिलीट झालेले मेसेजदेखील वाचू शकता आणि मोबाइल डेटा वाचवू शकता.

3/7

डेटा सेव्ह

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

फोन,व्हिडीओ कॉल किंवा व्हॉईस कॉल दरम्यान तुमच्या फोनचा जास्त डेटा वापरला जातो का? अनेकदा फोनवर बोलून पूर्ण होत नाही तरी मोबाइल डेटा संपल्याचे नोटिफिकेशन येते. व्हॉट्सॲप कॉल्स दरम्यान डेटा वारंवार संपल्याने तुम्हाला त्रास होत असेल, तर तुम्ही सेटिंग्ज बदलून डेटा सेव्ह करू शकता.

4/7

लो डेटा यूज इन कॉल

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

मोबाईल डेटा सेव्ह करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सॲपच्या ‘सेटिंग्ज’ पर्यायावर जा. यानंतर ‘डेटा आणि स्टोरेज’ या पर्यायावर क्लिक करा.  'लो डेटा यूज इन कॉल' हा पर्याय निवडा. आता तुमच्या व्हिडिओ कॉल किंवा व्हॉईस कॉल दरम्यान डेटाचा वापर कमी होईल.

5/7

स्टार चॅट्स

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

तुम्ही चॅटला स्टार केलात तर ते चॅट बॉक्सच्या टॉपला दिसेल. एखादे चॅट स्टार करायचे असेल तर ते दाबून ठेवा. त्यानंतर स्टारचा पर्याय येईल तो निवडा. यामुळे तुम्ही मेसेज हवा तेव्हा वाचू शकता. 

6/7

डिलीट झालेले मेसेज वाचा

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

आपल्याला कोणीतरी मेसेज पाठवतो पण नंतर तो डिलीट करतो, मग त्यात असं काय होतं की डिलीट केलं? असा प्रश्न सारखा मनात येतो.  डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशन हिस्ट्री पर्यायावर जा. येथे ऑन आणि ऑफचा पर्याय दिसेल. हे सुरु करा.

7/7

नोटिफिकेशन ऑन

WhatsApp Tricks How Read deleted messages Date Save

यामध्ये तुम्ही ज्या ॲप्सच्या नोटिफिकेशन्स वाचू इच्छिता त्यांची परवानगीही तुम्ही ऑनन करू शकता. तुम्ही व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन ऑन ठेवले असेल तर डिलीट झालेले मेसेजदेखील दिसतील.