गावच्या वेशीवर, गड-किल्ल्यांवर दिसणारे वीरगळ म्हणजे काय?

 तुमच्या गावात किंवा रस्त्याने जाताना तुम्हाला माणसाच्या आकाराचे चित्र असलेले दगड दिसलेत का? पण या चित्रात रेखाटलेले कलाकृती नेमकी काय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. आज याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Mansi kshirsagar | Jan 27, 2025, 14:16 PM IST

 तुमच्या गावात किंवा रस्त्याने जाताना तुम्हाला माणसाच्या आकाराचे चित्र असलेले दगड दिसलेत का? पण या चित्रात रेखाटलेले कलाकृती नेमकी काय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे. आज याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

1/8

गावच्या वेशीवर, गड-किल्ल्यांवर दिसणारे वीरगळ म्हणजे काय?

What is the virgal meaning in marathi

तुम्ही कधी गड-किल्ल्यांवर फिरायला गेल्यावर तिथे हे दगड अस्तित्वात असतात. साधारण अडीच ते तीन फुट उंचीच्या पाषाणावर किंवा एखाद्या शिळेवर एक ते तीन असे  मानवाकृती चित्र रेखाटलेले असतात. कधी कधी एखाद्या गावच्या वेशीवरदेखील असे स्तंभ दिसतात. या स्तंभांना  वीरगळ असं म्हणतात. वीरगळ कुठे असतात आणि ते का बनवले जातात, हे जाणून घेऊया. 

2/8

वीरगळ म्हणजे युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेला दगडी स्तंभ. वीरगळाला वीरस्तंभ असेही म्हणतात. वीरगळ हे एकप्रकारे इतिहासाचे मुक साक्षीदार असतात. 

3/8

वीरगळ ही परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असं मानलं जातं. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. वीरगळांवर विविध आकृत्या असतात. 

4/8

वीरगळांच्या माध्यमातून काळाच्या ओघात हरवलेला इतिहास उलगडला जातो. वीरगळाला वीरस्तंभ असंही म्हणतात.

5/8

युद्धात शहिद झालेल्या वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे वीरगळ.  

6/8

युद्धात शहिद झालेल्या वीरगती प्राप्त झालेल्या वीराचे स्मरण करण्यासाठी पाषाणावर काही विशिष्ट केलेले शिल्पांकन किंवा दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे वीरगळ.

7/8

वीरगळावर चंद्र-सूर्यदेखील असतात जोवर चंद्र- सुर्य आहेत तोवर त्या वीराचे स्मरण होत राहिल असा या चंद्र - सुर्य कोरण्याचा अर्थ आहे.

8/8

वीरगती प्राप्त झालेल्या वीरासोबत त्याची पत्नी सती गेली असेल तर त्या वीरगळावर हात कोरलेला असतो. त्या हातावर बांगड्या किंवा केवळ हात कोरलेला असतो. त्याला सतीशिळा असे देखील म्हणत असल्याची माहिती दिली