बॉलिवूडचा 'हा' अभिनेता हिरो म्हणून नाही तर खलनायक म्हणून अधिक लोकप्रिय; कोण आहे हा सुपरस्टार?

चित्रपटातील कलाकार म्हटलं की सर्वांच्याच नजरेत येतात ते पडद्यावर झळकणारे मुख्य भूमिकेतील अभिनेते आणि अभिनेत्री. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे कित्येक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटात हीरोची भूमिका साकारण्यासाठी पदार्पण केले. मात्र, त्यातील काहींना खलनायकाच्या भूमिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे, ज्याने साकारलेले मुख्य भूमिकेतील चित्रपट तर सुरुवातीला फ्लॉप ठरले मात्र, त्यानंतर चित्रपटातील साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याना प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील हीरोच्या भूमिकेपेक्षा त्याची खलनायकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली.

Jan 27, 2025, 12:36 PM IST

Bollywood Actor: चित्रपटातील कलाकार म्हटलं की सर्वांच्याच नजरेत येतात ते पडद्यावर झळकणारे मुख्य भूमिकेतील अभिनेते आणि अभिनेत्री. बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे कित्येक लोकप्रिय कलाकार आहेत ज्यांनी चित्रपटात हीरोची भूमिका साकारण्यासाठी पदार्पण केले. मात्र, त्यातील काहींना खलनायकाच्या भूमिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. बॉलिवूडमध्ये असाच एक अभिनेता आहे, ज्याने साकारलेले मुख्य भूमिकेतील चित्रपट तर सुरुवातीला फ्लॉप ठरले मात्र, त्यानंतर चित्रपटातील साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे त्याना प्रचंड लोकप्रियता मिळाली. चित्रपटातील हीरोच्या भूमिकेपेक्षा त्याची खलनायकाची भूमिका ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीची ठरली. आज हा अभिनेता बॉलिवूडमधील सुपरहिट खलनायक म्हणून ओळखला जातो. 

1/7

बॉलिवूडचा सुपरहिट खलनायक

बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याने आपल्या करिअरची सुरुवात एका सुपरहिट चित्रपटाने केली होती. मात्र, या चित्रपटानंतर त्याचे कित्येक चित्रपट हे फ्लॉप ठरत होते. त्याच्या करिअरचा ग्राफ हा ढासळत चालला होता. परंतु, अशातच त्याने साकारलेल्या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. आज हा अभिनेता बॉलिवूडच्या टॉप विलन्सपैकी एक आहे.   

2/7

90 च्या दशकातील सुपरहिट हीरो

या अभिनेत्याने 90 च्या दशकात आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या अभिनेता 28 वर्षांपासून बॉलिवूड सिनेसृष्टीत कार्यरत आहे. या अभिनेत्याने आपल्या अभिनय कार्यक्षेत्रात 44 हून अधिक चित्ररपटात काम केलं आहे. आजसुद्धा प्रेक्षक आवडीने त्या दशकातील या अभिनेत्याचे चित्रपट पाहतात. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.   

3/7

लोकप्रिय अभिनेता बॉबी देओल

बॉलिवूडमधील हा प्रसिद्ध अभिनेता म्हणजेच हिंदी सिनेमातील दिग्गज सुपरस्टार धर्मेंद्र यांचा लहान मुलगा आणि अभिनेता सनी देओल यांचा लहान मुलगा बॉबी देओल. आज बॉबी देओलचा 56 वा वाढदिवस आहे. बॉबीचा जन्म 27 जानेवारी 1969 ला मुंबई मध्ये झाला.   

4/7

करिअरची सुरुवात

बॉबी देओलने राजकुमार संतोषी यांचा 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बरसात' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाने 34 कोटींची कमाई केली आणि बॉक्स ऑफिवर हीट चित्रपट ठरला. 1997 मधील त्याचा 'गुप्त' हा चित्रपट तसेच त्यानंतरचा 'सोल्जर' हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला.   

5/7

वर्षभर लगातार फ्लॉप चित्रपट

'सोल्जर' या हीट चित्रपटानंतर मात्र, त्याचे तब्बल 11 चित्रपट हे फ्लॉप ठरले. पण 2011 मध्ये त्याने पुन्हा करिअरला सुरुवात करत वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओलसोबत 'यमला पगला दीवाना' हा चित्रपट केला आणि तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र, त्यानंतरही त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले. 2013 मध्ये त्यांनी याच चित्रपटाचा 'यमला पगला दीवाना फिर से'चा सिक्वेल बनवला, पण तोही फ्लॉप ठरला. यानंतर त्याचे 'पोस्टर बॉईज', 'रेस-3' सारखे चित्रपटही फ्लॉप ठरले.  

6/7

खलनायकाच्या भूमिकने पुन्हा मिळाला स्टारडम

बॉबीच्या करिअरमध्ये त्याला चित्रपटांमध्ये वारंवार अपयश मिळत होते. परंतु, एका संधीमुळे त्याच्या करिअरला अनोखे वळण मिळाले. 2020 मध्ये, त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आणि प्रकाश झा यांच्या 'आश्रम' या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्याला विलन म्हणून यश मिळाले. यानंतर त्याने 2023 मध्ये रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. ज्याने बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर 'कांगुवा' या चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला.  

7/7

बॉबी देओल आहे कोटींचा मालक

प्रेक्षकांकडून बॉबीच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळात असल्याचं पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे. तसेच बॉबीकडे 5 आलिशान कार आहेत. मुंबईतील विलेपार्ले मध्ये एका आलिशान बंगल्यात तो कुटुंबासोबत राहतो.