बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास नेमकी काय शिक्षा होते? उत्साहात फोटो शेअर करण्याआधी जाणून घ्या

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.  

Shivraj Yadav | Aug 21, 2024, 18:53 PM IST

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कोलकातामधील बलात्कार पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

1/11

कोलकाताच्या आर जी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.   

2/11

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी पीडित महिला डॉक्टरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश दिले आहेत.  

3/11

सरन्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने पीडितेची ओळख जाहीर कऱणं निपुण सक्सेना प्रकरणी देण्यात आलेल्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.   

4/11

अशा स्थितीत बलात्कार पीडितेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी नेमकी काय शिक्षा आहे हे जाणून घ्या.   

5/11

कोणत्याही बलात्कार पीडितेचा फोटो शेअर करणं बाल न्याय कायदा 2015 मधील तरतुदीचं उल्लंघन आहे.   

6/11

यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, कुटुंबाच्या माहितीसह पीडित मुलीची ओळख जाहीर होईल अशी कोणतीही माहिती जाहीर केली जाऊ नये.   

7/11

कलम 72 मध्ये यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. कोणतीही व्यक्ती, गट अशा व्यक्तीची ओळख जाहीर करत असेल, तिचे फोटो सोशल मीडिया किंवा टीव्हीवर दाखवत असेल तर हे कायद्याचं उल्लंघन आहे.   

8/11

अशा स्थितीत ओळख जाहीर करणाऱ्या व्यक्तीला काही महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते.   

9/11

बीएनस 64 ते 71 पर्यंतच्या कलमात महिला आणि मुलांवर होणाऱ्या बलात्कार आणि लैगिक अत्याचारावर भाष्य करण्यात आलं आहे.   

10/11

यात सांगण्यात आलं आहे की, पीडित तरुणी मृत्यूच्या दारात असेल आणि ओळख जाहीर कऱणं फारच गरजेचं असेल तेव्हाच केलं जावं.   

11/11

यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सेशन जज स्तरावरील किंवा त्याच्या पुढील स्तरावरील अधिकाऱ्यांना आहे.