भारत पाकिस्तानमध्ये 'वाक'युद्ध, विराट कोहली की बाबर आझम? ICC प्रश्नावर फॅन्स भिडले!

Virat kohli vs Babar Azam: विराट कोहली आणि बाबर आझम दोन्ही खेळाडू आपल्या कवर ड्राईव्हसाठी (Cover Drive) ओळखले जातात. अशातच आयसीसीने (ICC) विचारलेल्या एका प्रश्नावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.

| May 05, 2023, 23:00 PM IST

Virat kohli vs Babar Azam: विराट कोहली म्हणजे भारतीय क्रिकेटची शान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अफलातून कामगिरीच्या विराटने नाव कमवलंय. तर दुसरीकडे बाबर आझम पाकिस्तानसाठी मोलाची कामगिरी करतोय. विराट आणि बाबर आझम यांच्यात एक कॉमन दुवा आहे तो म्हणजे कवर ड्राईव्ह (Cover Drive).

1/5

विराट कोहली आणि बाबर आझम दोन्ही खेळाडू आपल्या कवर ड्राईव्हसाठी ओळखले जातात. अशातच आयसीसीने विचारलेल्या एका प्रश्नावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.

2/5

आतापर्यंतचा सर्वोत्तम कव्हर ड्राइव्ह असलेला बॅटर कोण आहे? असा सवाल आयसीसीने विचारला. त्यावर भारत आणि पाकिस्तानचे फॅन्स भिडल्याचं पहायला मिळालं. 

3/5

भारतीय फॅन्सने विराट कोहलीच्या कवर ड्राईव्हचं कौतूक केलंय तर पाकिस्तानी फॅन्सने बाबर आझमचे गोडवे गायले आहेत.

4/5

केन विल्यमसनला एकदा विचारण्यात आलं होतं की, कोहली आणि बाबर यांच्यामध्ये कोण कव्हर ड्राइव्ह अधिक चांगला खेळतो? त्यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.

5/5

मला विराट कोहलीचा कव्हर ड्राइव्ह अधिक आवडतो, असं केन विल्यमसन म्हणाला होता. त्यामुळे आता पाकिस्तानी फॅन्सने केन विल्यमसनचं तरी ऐकावं, असं भारतीयांनी पाकड्यांना सुनावलं आहे.