श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचं अनोखं साजरं रुप

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आज वसंत पंचमीच्या दिवशी संपन्न झाला.

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा आज वसंत पंचमीच्या दिवशी संपन्न झाला.

1/10

सुंदर पोशाख आणि अलंकार सजावट केलेल्या विठ्ठल रुक्मिणी यांच्या विवाह पूर्वीचे आणि नंतरचे रुप समोर आले आहे. 

2/10

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा साठी आत्ता पासूनच मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. 

3/10

24 प्रकारची साडे चार टन फुले वापरून ही सजावट केली आहे. आज दुपारी 12 वाजता हा विवाह सोहळा मंदिरात संपन्न झाला आहे.

4/10

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्यासाठी खास ऑर्किड आणि लीलियम या थायलंडच्या फुलांची सजावट पुष्प सजावट करणारे भारत भुजबळ यांनी केली आहे.

5/10

जवळपास साडेचार टन फुले वापरून ही सजावट केली आहे. सोबत एक टन उसाचे वापर सुद्धा केला आहे.

6/10

श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा हा वसंत पंचमीला साजरा होत असतो. विवाह पूर्वी त्याकाळी रुक्मिणी देवाला म्हणजेच विठ्ठल रूपी कृष्णाला पाहिले प्रेम पत्र पाठवले होते.

7/10

जवळपास सात श्लोक असणारे हे पत्र होते असे रुक्मिणी स्वयंवर कथे मध्ये सांगितले जाते. विवाह सोहळा आणि त्यापूर्वी रुक्मिणी झालेल्या घटनांची चित्र मंदिरात लावली आहेत.

8/10

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. 

9/10

जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किड जिनियम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.

10/10

श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे.