'वन नाईट स्टॅण्ड'मधील चुकीमुळे ही अभिनेत्री लग्नाशिवाय झाली प्रेग्नेंट, घाईघाईत घेतला होता मोठा निर्णय

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकारांशी संबंधित अनेक गोष्टी सध्या समोर येताना दिसत आहेत. जे ऐकल्यानंतर सर्वांचे होश उडतात.

Soneshwar Patil | Feb 02, 2025, 15:27 PM IST
1/7

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांचे रहस्य त्यांच्या चाहत्यांना आजही माहित नाही. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी लग्नाशिवाय प्रेग्नेंट राहिली होती. 

2/7

या अभिनेत्रीने सलमान खानपासून ते सैफ अली खानपर्यंत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. 

3/7

आम्ही कुब्रा सैतबद्दल बोलत आहोत. अभिनेत्रीने तिच्या पुस्तकात तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक रहस्ये उघड केली आहेत. यापैकी एक तिच्या गर्भधारणेशी संबंधित आहे. 

4/7

एकदा तिने 'वन नाईट स्टॅण्ड' घेतला होता, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली आणि त्यावेळी ती 30 वर्षांची होती. यानंतर तिच्या आयुष्यात किती बदल घडवून आणले हे तिने सांगितले आहे. 

5/7

यासोबतच कुब्राने 'ई-टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीतही या घटनेचा उल्लेख केला होता आणि गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर तिला काय वाटले हे सांगितले होते.

6/7

त्यानंतर तिने एका आठवड्यानंतर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. कारण ती त्यासाठी तयार नव्हती. माझ्या भविष्यासाठी मी केलेल्या नियोजनाचा हा भाग नव्हता असं तिने सांगितले. 

7/7

गर्भपातानंतर तिला खूप वाईट वाटत होते. मात्र, तिला असे का केले याचे दु:ख नव्हते. उलट लोकांना हे कसे समजेल याची तिला भीती वाटत होती.