9 वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती तरी कमाई कोटींमध्येच, राहता बंगला तर राजा महाराजांपेक्षा कमी नाही

भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आज त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 वर्षांपूर्वी 2015 मध्ये सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तरीही कमाईच्या बाबतीत सेहवाग अनेक आजी क्रिकेटर्सना सुद्धा मागे सोडतो. तेव्हा वीरेंद्र सेहवागची एकूण संपत्ती, कार कलेक्शन आणि करिअरबद्दल जाणून घेऊयात. 

| Oct 20, 2024, 15:36 PM IST
1/9

वीरेंद्र सेहवागचा जन्म 20 ऑक्टोबर 1978 रोजी दिल्ली येथे झाला होता. सेहवाग हा उजव्या हाताचा फलंदाज असून कधीकधी त्यांनी ऑफ स्पिनर म्हणूनही भूमिका बजावली. वीरेंद्रला सेहवागला त्याचे मित्र 'वीरू' या टोपण नावाने हाक मारतात. 

2/9

वीरेंद्र सेहवागने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान तिहेरी शतकाचा विक्रम आहे. त्याने यात 319 धावा केल्या होत्या. सेहवाग हा एकदिवसीयमध्ये द्विशतक आणि कसोटीमध्ये तिहेरी शतक झळकावणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

3/9

श्रीमंतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर वीरेंद्र सहवाग हा जगातील श्रीमंत क्रिकेटर्सच्या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे. तर तो भारताचा ५ व्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. त्याची नेटवर्थ 42 मिलियन डॉलर म्हणजेच 350 कोटी रुपये इतकी आहे.   

4/9

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर जाहिराती, कॉमेंट्री आणि व्यवयासाय हे सेहवागच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत. वीरेंद्र सेहवाग मायक्रो-ब्लॉगिंगमधून देखील भरपूर कमाई करतो. सेहवाग ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह असतो. एका मुलाखतीत सांगितल्यानुसार तो ट्विटमधून त्याला सुमारे 3 मिलियन डॉलर्स कमावतो.   

5/9

सेहवाग इंटरनॅशनल स्कूल :

हरियाणामध्ये सेहवाग त्याची एक शैक्षणिक संस्था चालवतो ज्याचं नाव 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल' असं आहे. वीरेंद्र सेहवागने दुसरं तिहेरी शतक केल्यावर हरियाणा सरकारने त्याला 23 एकर जमीन भेट म्हणून दिली होती. सेहवागला त्याच्या दुसऱ्या तिहेरी शतकाच्या विक्रमानंतर हरियाणा सरकारने 23 एकर जमीन भेट म्हणून दिली होती, ज्यावर त्याने अकादमी बांधण्याचा निर्णय घेतला. या जमिनीवर त्यांनी आपली शाळा बांधली, ज्याचा उद्देश मुलांना शिक्षण देणे आणि देशातील खेळांना प्रोत्साहन देणे हा आहे.

6/9

वीरेंद्र सेहवागचं घर दिल्ली येथील एका पॉश ठिकाणी असून त्याचा आलिशान बांगला हौजखासमध्ये 'कृष्णा निवास' नावाने प्रसिद्ध आहे.काही वर्षांपूर्वी सेहवाग आपल्या कुटुंबासोबत नजफगढ़ शिफ्ट झाले होते. त्यांच्या घराची किंमत 130 कोटींच्या आसपास आहे. 

7/9

वीरेंद्र सेहवागचा बंगला :

वीरेंद्र सेहवागचा हा बंगला राजा-महाराजांच्या वाड्यापेक्षा कमी नाही. बंगल्यात प्रवेश केल्या बरोबरच एक गेस्ट रूम असून तिथे सेहवागला भेटायला येणाऱ्या लोकांना बसवलं जात. या घरात तब्बल 8  बाथरूम असून घरातील प्रत्येक कोपऱ्या न कोपऱ्याचे डिझाईन सुरेख आहे. घराच्या भिंतींवर अनेक महागडी पेंटिंग्स आहेत. 

8/9

वीरेंद्र सेहवाग कार कलेक्शन:

वीरेंद्र सेहवागकडे BMW 5 series आणि Bentley Continental Flying Spur ही लिमिटेड एडिशन असलेली गाडी आहे. सेहवागचे कार कलेक्शन एकूण 7 कोटींच्या घरात आहे. 

9/9

वीरेंद्र सेहवाग करिअर :

वीरेंद्र सेहवागने भारताकडून 104 टेस्ट क्रिकेटमध्ये 8586 धावा, 251 वनडेत 8273 धावा , आणि 19 टी 20 क्रिकेटमध्ये 394 धावा केल्या आहेत. वीरेंद्रच्या नावावर 38 शतक आणि 7 द्विशतक तर 72 अर्धशतकांचा समावेश आहे.