Anushka Sharma: लाडक्या बायकोच्या बर्थडेला विराटने शेअर केला 'तो' खास फोटो, म्हणाला...

Anushka Sharma Birthday: विराट कोहलीने (Virat Kohli) लाडक्या बायकोच्या बर्थडेनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

Saurabh Talekar | May 01, 2023, 11:58 AM IST

Anushka Sharma Virat Kohli: बॉलिवूडची स्टार अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त (Anushka Sharma Birthday) तिच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. विराट आणि अनुष्का (Virushka) म्हणजे क्युट कपल. पती विराट कोहलीसोबत तिचे सर्व फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. अशातच विराट कोहलीने लाडक्या बायकोच्या बर्थडेनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.

1/5

अनुष्का शर्माने शाहरुखसोबत रब ने बना दी जोडी या सिनेमामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज ती बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्री आहे.

2/5

पिके, बँड बाजा बारात, परी अशा सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का शर्माने नाव देखील कमवलं. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी लगीनगाठ बांधली.

3/5

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका शॅम्पू ब्रँडच्या जाहिरातीच्या सेटवर भेटले आणि सुरू झाली लवस्टोरी. अशातच अनुष्काच्या वाढदिवसानिमित्त विराटने अनुष्काचे काही फोटो शेअर केले आहेत.

4/5

व्हाईट चिकनकारी वनपिस, व्हाईट स्वेटशर्ट,ब्लॅक कफ्तान,लव्हेंडर टीशर्ट, ऑरेंज मोनोकिनी, ब्लॅक जंपसूट, ब्लॅक गॉगल, असा कपड्यातील फोटो शेअर केले आहेत.

5/5

दरम्यान, अनुष्का नेहमीच तिचा पती विराट कोहलीच्या पाठीशी उभी राहिली आहे. जिंका किंवा हार, अनुष्काने विराट कोहलीला नेहमीच पाठिंबा दिला आहे. खेळाच्या मैदानातही ती नेहमी कोहलीला चिअर करण्यासाठी पोहोचते.