IPL 2023 : चुकीला माफी नाही! आयपीएलमध्ये Virat Kohli वर बंदी घालणार?

Virat Kohli, IPL 2023: स्टँड-इन कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (IPL Code of Conduct) दंड ठोठावण्यात आला आहे. विराटने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल. 

Apr 25, 2023, 20:25 PM IST

Virat Kohli, IPL 2023: पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) जोरदार कमबॅक केलं. त्याचबरोबर विराट कोहली (Virat Kohli) देखील यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करत आहे. मागील दोन सामन्यात विराट आरसीबीचं (RCB) नेतृत्व करतोय. तर त्याआधी डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली संघाने दोन सामने गमावले होते. अशातच बंगळुरू संघासमोर मोठी समस्या निर्माण झालीये.

1/7

आता विराटने दोन विजय आयसीबीच्या पारड्यात खेचून आणले आहेत. अशातच आता विराटवर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

2/7

पोटदुखीच्या कारणामुळे डुप्लेसिसने संघाची जबाबदारी विराटवर सोपवली. मात्र, संघाला फटका बसतोय, तो आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचा.

3/7

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्या. त्यामुळे आरसीबीला दुसऱ्यांदा दंड भरावा लागला आहे.

4/7

स्टँड-इन कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार दंड ठोठावण्यात आला आहे.

5/7

आयपीएलच्या पालनवेळेत ओव्हर्स पूर्ण न केल्याने, 24 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आलाय. या आधी देखील दुसऱ्या सामन्यानंतर कॅप्टन डुप्लेसिसवर 12 लाखाचा दंड लावण्यात आला होता.

6/7

संघाकडून दुसऱ्यांदा चूक झाली तर मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात येतो. त्यानुसार आता विराट अँड कंपनीला 24 लाखांचा दंज भरावा लागतोय.

7/7

दरम्यान, विराटने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल. जर विराट कॅप्टन असेल तर ही शक्यता आहे.