Virat Kohli आणि Anushka Sharma कायमच का ठरतात Perfect Couple? शिकण्यासारख्या 7 गोष्टी
Virat Kohli Anushka Sharma Wedding Anniversary : ज्या देशात क्रिकेट आणि सिनेमाला धर्म मानला जातो, तिथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही एक खास जोडी आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी या दोघांच लग्न झालं. आज या दोघांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस आहे. एकमेकांना खंबीर साथ देत हे दोघे देतात Couple Goal
Virat Kohli Anushka Sharma Couple Goal : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे कायमच प्रेक्षकांच्या लोकप्रिय जोडीपैकी एक राहिले आहेत. इटलीतील ८०० वर्षे जुन्या व्हिलामध्ये या दोघांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. हे दोघे अगदी मैदानावर असो किंवा खासगी जीवनात कायमच प्रेक्षकांसमोर आदर्श ठेवतात. नुकताच विराट कोहली आणि टिम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपचा अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. या दरम्यान अनुष्का शर्माची कृती सगळ्यांचच लक्ष वेधून गेली. अनुष्का शर्माने विराट कोहलीला घट्ट मिठी मारुन त्याच सांत्वन केलं.
जेव्हा पण हे दोघे समोर येतात तेव्हा एक परफेक्ट कपल गोल शेअर करत असतात. या दोघांकडून प्रत्येक कपलने शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. कोणत्या ते जाणून घेऊया.
‘मी जगातील सर्वात महान व्यक्तीशी लग्न केले आहे’: अनुष्का

अनुष्का शर्मा कायमच पती आणि क्रिकेटर विराट कोहलीचं कौतुक करत असते. ती म्हणते की, 'मी जगातील सगळ्यात खास व्यक्तीशी लग्न केलंय.'विराट आणि अनुष्का साधेपणाने आपले नातेसंबंध सांभाळताना दिसतात. नात्यामध्ये कायमच एकमेकांचा आदर करणे अतिशय महत्त्वाचे असते. आपला जोडीदार हा जगातील खास व्यक्तिमत्त्व आहे हा विचार तुम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ नेऊ शकतो.
‘आम्ही साधे लोक आहोत ज्यांना सामान्य गोष्टी करायच्या आहेत’: अनुष्का

लोकप्रियता, प्रसिद्धीपासून कायम दूर: अनुष्का

विराट आणि अनुष्का यांना त्यांच्या खाजगी आयुष्याचे क्षण खास हवेत. हे दोघे अजिबातच सोशल मीडियावर खासगी गोष्टी शेअर करताना दिसत नाही. लेक वामिकाचे फोटो देखील अजून शेअर केलेले नाहीत. एवढंच नव्हे तर यांना पापाराझींना देखील मुलीचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. आपण आपल्या करिअरमध्ये कितीही मोठ्या उंचीवर गेलो तरी आपल्या मनातील भावना आणि आपलं खासगी जीवन हे अतिशय सामान्य ठेवण्यात खरी मजा आहे.
प्रगतीमध्ये एकमेकांची साथ: विराट

अनुष्कामुळे बदललो मी - विराट

कठीण प्रसंगाचा सामना एकत्र करतात

विराट-अनुष्का कोणत्याही प्रसंगाचा सामना एकत्र करतात आपण पाहिलं आहे. अगदी ट्रोलर्सला देखील या दोघांनी खंबीरपणे उत्तर दिलं आहे. 2016 मध्ये विराटने अनुष्कासाठी केलेल ट्विट अतिशय खास ठरलं आहे. त्या वर्षातील सर्वाधिक रिट्विट ठरलेले ते ट्विट आहे. ते फक्त ट्विट नाही तर एक भावना आहे. विराटने अनुष्काला दिलेली खंबीर साथ अतिशय महत्त्वाची ठरत आहे.
वामिकासाठी घेतलेला निर्णय
