Virat Kohli Birthday : 'बर्थ डे आहे भावाचा...' पाहा विराट कोहलीचे कधीही न पाहिलेले फोटो

Happy Birthday Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आपला 35 वा वाढदिवस साजरा करतोय. जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहलीचा समावेश होतो. विराट कोहली सध्या  आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचां प्रतिनिधित्व करत असून त्याची कामगिरीही दमदार होतेय. सात सामन्यात विराटने एका शतकासह 442 धावा केल्या आहेत. आपल्या वाढदिवसाला विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विक्रमांशी बरोबरी करणार का याकडे  क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात 48 शतक केली आहेत.

राजीव कासले | Nov 04, 2023, 20:19 PM IST
1/10

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2008 मध्ये अंडर-19 चा विश्वचषक स्पर्धा जिंकली. यानंतर विराट कोहली चर्चेत  आला. आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने थेट टीम इंडियात प्रवेश केला. विराट 18 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला. यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.

2/10

विराट कोहलीचा जन्म एका मध्यमवल्गीय कुटुंबात झाला. 5 नोव्हेंबर 1988 ला मध्य प्रदेशतील कटनी जिल्ह्यात विराटचा जन्म झाला. विराटचे आजोबा फाळणीदरम्यान मध्यप्रदेशात आले होते. पण त्यानंतर विराटचे वडील प्रेम कोहली आपल्या कुटुंबासह दिल्लीत स्थायिक झाले. 

3/10

विराट तीन ते चार वर्षांचा असतानाचा हा फोटो आहे, त्यावेळी त्याच्या हातात खेळण्यातील बंदुक होती. आज विराटच्या हातात बॅट आहे आणि त्या बॅटने त्याने अनेक रेकॉर्ड रचले आहेत. 

4/10

लहानपणीच्या या फोटो विराट कोहली आपली बहिण भावनाबरोबर दिसत आहे. त्याच्याबरोबर त्याचा भाऊ विकास कोहलीही दिसत आहे. 

5/10

या फोटोत विराट आई सरोज आणि मोठी बहिण भावानाबरोबर केप कापता दिसतोय. 

6/10

विराट कोहलीच्या वाढदिवसाचा हा फोटो आहे. या फोटोत विराट वडिल प्रेम कोहली आणि आई सरोज बरोबर दिसत असून त्याचा भाऊ आणि त्याच्या मित्रांना केक भरवताना दिसत आहे. 

7/10

विराटला लहानपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड होती. त्याच्या वडीलांनाही त्याला नेहमीच प्रोत्साहन दिलं. वयाच्या नवव्या वर्षी त्याची क्रिकेट ट्रेनिंग सुरु केली. वडील त्याला स्कूटरवरुन दिल्ली क्रिकेट अकादमीत नेत.

8/10

विराट कोहलीने दिल्ली क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे धडे गिरवले. इथे राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाकाली त्याने क्रिकेटचे बारकावे जाणून घेतले.

9/10

2006 मध्ये  विराट कोहली आपल्या मित्रांबरोबर दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडला भेटला, आपला रोल मॉडेल समोर असल्याचं पाहून विराट भारावून गेला होता. योगायोग म्हणजे आज विराट कोहील टीम इंडियात आहे आणि राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच

10/10

पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहलीने 78 शतकं ठोकली असून यात कसोटी सामन्यात 29, एकदिवसीय सामन्यात 48 आणि टी20 क्रिकेटमध्ये एका शतकाचा समावेश आहे.