पृथ्वीवरील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल; हेलीकॉप्टरमधून प्रवेश, सोन्याची कॉफी आणि... कुबेराला लाजवणारा थाटमाट

जगातील एकमेव10 स्टार हॉटेल कुठे आहे? जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Feb 08, 2025, 20:54 PM IST

Burj Al Arab Hotel : जगभरात शेकडो 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल आहेत. पण तुम्हाला  10 स्टार हॉटेल बद्दल माहित आहे का? जगात फक्त एकच 10 स्टार हॉटेल आहे. या हॉटेलचे एका रात्रीच भाड ऐकून चक्कर येईल. इथं येणाऱ्या पाहुण्यांना हेलीकॉप्टरमधून हॉसेमध्ये प्रवेश मिळते. इतकचं नाही तर सोन्याची कॉफी  देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाते. जाणून घेऊया हे हॉटेल कुठे आहे. 

1/7

 जगातील 10 स्टार हॉटेलमध्ये अशा लक्झरी सुविधा मिळतात की थाटमाट पाहून कुबेरालाही लाट वाटेल. मात्र, इथं रहायलचं असेल एका रात्रीसाठी 10 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतात. 

2/7

भव्यता आणि लक्झरी सुविधांमुळे जगभरातील व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना हे हॉटेल आकर्षित करते. हॉटेलच्या जमिनीपासून छतापर्यंतच्या खिडक्यांमधून अरबी समुद्राचे अद्भुत दृश्य दिसते.  

3/7

या हॉटेलमध्ये एका रात्रीसाठी 10 लाखांपेक्षा जास्त शुल्क आकारले जात. यात हेलिकॉप्टर आणि  रोल्स-रॉइस लिमोझिन राईडचा समावेश असतो. कारण इथं येणाऱ्यांना हेलिकॉप्टरने प्रवेश मिळतो.   

4/7

या हॉटेलचे इंटिरेअर पाहूनच  या हॉटेलची भव्यता लक्षात येते. हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा वापर करुन सजावट करण्यात आली आहे.   

5/7

 हे आलिशान हॉटेल 321 मीटर उंच आहे आणि त्याचे बांधकाम १९९९ मध्ये पूर्ण झाले. हे ब्रिटिश वास्तुविशारद टॉम राईट यांनी डिझाइन केले आहे. 

6/7

बुर्ज अल अरब असे या हॉटेलचे नाव आहे. दुबईची ओळख बनलेले बुर्ज अल अरब हॉटेल हे 10 स्टार हॉटेलचा दर्जा मिळालेले हे जगातील एकमेव हॉटेल आहे.

7/7

हे अति-आलिशान हॉटेल दुबईतील एका कृत्रिम बेटावर बांधले गेले आहे. अलौकिक आदरातिथ्य, भव्य डिझाइन आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसाठी हे हॉटेल ओळखले जाते.