PHOTO:...अन् 'हा' फोटो शाहरुख-अजयचा शेवटचा ठरला; यामुळे दोघे झाले एकमेकांचे कट्टर शत्रू, एकमेकांचं तोंडही पाहिलं नाही

Shahrukh Khan and Ajay Devgn: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते-अभिनेत्री आहेत जे एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत. विशेष म्हणजे हे शत्रुत्व कित्येक वर्षं कायम राहतं. शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यातील शत्रुत्वही असंच कित्येक वर्षं सुरु होतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?  

Shivraj Yadav | Nov 06, 2024, 12:04 PM IST
1/11

राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला 'करण अर्जुन' चित्रपट 1995 मधील हिट चित्रपटांच्या यादीत होता.   

2/11

या चित्रपटात शाहरुख खान, सलमान खान मुख्य भूमिकेत होते. दोघांनी एकत्र काम केलेला हा पहिलाच चित्रपट होता. पण तुम्हाला माहिती आहे का आधी सलमान खानच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली होती.   

3/11

राकेश रोशन यांनी 2020 मध्ये दिलेल्या मुलाखतीत करण-अर्जुन चित्रपटासाठी शाहरुख आणि अजय देवगण यांना पहिली पसंती होती असा खुलासा केला होता.   

4/11

शाहरुख खानने अर्जुन आणि अजय देवगणने करणची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. पण दोन्ही अभिनेत्यांना दुसरी भूमिका हवी होती. विशेष म्हणजे दोघांनी या चित्रपटासाठी फोटोशूटही केलं होतं. 

5/11

राकेश रोशन यांनी सांगितलं होतं की, “अभिनेत्यांची मूळ निवड शाहरुख खान आणि अजय देवगण होते. परंतु ते त्यांच्या पात्रांवर खूश नव्हते आणि त्यांना अदलाबदली करायचं होतं. त्यामुळे शाहरुखला करणची भूमिका करायची होती तर अजयला अर्जुनची भूमिका करायची होती. मात्र, मी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनीही चित्रपटातून माघार घेतली".  

6/11

शाहरुख आणि अजयनंतर राकेश रोशन यांनी आमिर खान आणि सलमान खानशी संपर्क साधला. दोघांनाही स्क्रिप्ट आवडली होती. पण यावेळी आमिर दुसऱ्या चित्रपटात व्यस्त होता.   

7/11

राकेश रोशन यांनी खुलासा केला की, शाहरुख त्यांच्याकडे परत आला आणि मला चित्रपट करायचा आहे असं सांगितलं. यामुळे त्यांनी शाहरुख आणि सलमानला कास्ट केलं.   

8/11

“मग मी सलमान खान आणि आमिर खान यांच्याशी संपर्क साधला. दोघांनाही चित्रपटाची कथा फार आवडली होती. पण आमिरने स्पष्ट केले की, तो एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र असल्याने सहा महिन्यांनी शुटिंग सुरु करु शकतो. पण मी इतका वेळ थांबू शकत नव्हतो. दरम्यान, सलमान आणि आमिरने काम करण्यास उत्सुकता दाखवल्याचं शाहरुखला समजलं. त्याचवेळी तो माझ्याकडे परत आला", असं राकेश रोशन यांनी सांगितलं.   

9/11

पुढे ते म्हणाले की, “त्याने सॉरी म्हटले आणि त्याला चित्रपट करायचा आहे असा आग्रह धरला. त्याच्या तारखा उपलब्ध होत्या. त्यामुळे मी आमिरकडे जाऊन परिस्थिती सांगितली. तसंच, मी याआधी शाहरुखसोबत काम केलं होतं. मी त्याला किंग अंकलमध्ये ब्रेक दिला असं तुम्ही म्हणू शकता. आमिरने समजूतदारपणा दाखवला आणि अशा प्रकारे चित्रपटातील मुख्य कलाकारांची निवड झाली".  

10/11

पण शाहरुख पुन्हा राकेश रोशन यांच्याकडे गेल्याचं समजल्यानंतर अजय देवगण नाराज झाला. दोघांनीही सहमतीने चित्रपटातून माघार घेतली होती आणि तो न करण्याचं ठरवलं होतं.   

11/11

पण शाहरुख चित्रपट करत असल्याचं समजल्यानंतर अजय देवगण इतका नाराज झाला की, शाहरुखसह बोलणंच बंद झालं. यानंतर दोघांमधील अबोला आणि शत्रुत्व इतकं वाढलं की त्यांनी एकमेकांसोबतच कामच केलं नाही. आजपर्यंत दोघांनी जाहिरात वगळता एकाही चित्रपटात काम केलेलं नाही.