Vastu Tips: सातत्याने वाढतोय कर्जाचा डोंगर? हे उपाय करून पाहा, होईल फायदा

Nov 16, 2022, 16:54 PM IST
1/5

घरात तुटकी कुंडी नको

Vastu Tips to get rid of debt and attract positive energy

जर तुमच्या घरात तुटकी कुंडी असेल तर तीही तातडीने बदलून टाका किंवा घराबाहेर काढा. अनेकदा अनेकजण घराच्या टेरेसवर तुटलेल्या कुंड्या किंवा तुटलेली मडकी ठेवतात. वास्तुशात्राप्रमाणे तुटलेली मडकी ठेवणं अशुभ मानलं जातं.

2/5

घरात बंद पडलेलं घड्याळ नसावं

Vastu Tips to get rid of debt and attract positive energy

आपल्या सर्वांच्या घरात भिंतीवर टांगलेलं घड्याळ हे असतंच. वास्तुशात्रात घरातील घड्याळांबाबत विविध नियम आहेत. तुमच्या घरात बंद पडलेलं घड्याळ असेल तर घर निर्जीव होतं. अशा घरांमध्ये कायम आरोग्याशी संबंधित अडचणी सतावतात. अशा घरात लक्ष्मी टिकत नाही. म्हणूनच घरात बंद घड्याळ नसावं.  

3/5

घरात फुटलेला आरसा नसावा

Vastu Tips to get rid of debt and attract positive energy

सर्वात महत्त्वाची गोषट म्हणजे घरात फुटलेला आरसा नसावा. फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा कर्जाचं मुख्य कारण ठरतो असं वास्तुशात्र म्हणतं. असा आरसा असल्यास तातडीने त्याला घराबाहेर काढा. सोबतच बेडरुममधील ड्रेसिंग टेबलवरील आरसा हा बेडकडे तोंड करून नसावा. घरातील कपाटावर आरसा असेल तर त्यावर पडदा लावून घ्यावा. घरामध्ये किंवा खोलीत गंज लागलेले किंवा तुटलेले आरसे नसावे.

4/5

घरात खराब फर्निचर देखील ठेवू नका

Vastu Tips to get rid of debt and attract positive energy

घरात खराब फर्निचर देखील ठेवू नका. हे फर्निचर स्टोअर रुममध्येही नसावं. हे देखील अशुभ मानलं जातं. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे कुटुंबामध्ये तणाव पाहायला मिळतो. घरात तुटलेला पलंग देखील नसावा. यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. यामुळे घरात शांतता नांदत नाही आणि घरातील लक्ष्मी नाराज होते.  

5/5

घरात तुटकी फुटकी भांडी ठेवू नका

Vastu Tips to get rid of debt and attract positive energy

घरात तुटकी फुटकी भांडी ठेवू नका. वास्तुशात्राप्रमाणे यामुळे तुमच्यावर कर्जाचा डोंगर वाढत जातो. वास्तुशात्राप्रमाणे जेवणाची भांडी व्यवस्थित आणि स्वच्छ असायला हवी. अनेकदा घरातील तुटकी फुटकी भांडी सांभाळून स्टोअर रुममध्ये ठेवली जातात. मात्र असं करणं अतिशय खराब मानलं जातं. यामुळे तुम्ही तुमच्या वाईट वेळेला आमंत्रण देतात असं बोललं जातं. तुटकी भांडी दारिद्याचं लक्षण मानलं जातं.   (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. ZEE 24 TAAS याच्या सत्य असत्येबाबत पुष्टी करत नाही.)