16 व्या वर्षी लग्न, 17 व्या वर्षी जुळ्यांचा जन्म अन् 18 व्या वर्षी घटस्फोट... ही लोकप्रिय अभिनेत्री आहे तरी कोण?
चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींचे वैयक्तिक आयुष्य मात्र काही वेगळेच असते. सिनेजगतात जरी प्रसिद्धी मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो.
चित्रपटातील रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या अभिनेत्रींचे वैयक्तिक आयुष्य मात्र काही वेगळेच असते. सिनेजगतात जरी प्रसिद्धी मिळत असली तरी खऱ्या आयुष्यात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो.
1/6

2/6

या अभिनेत्रीने पडद्यावर अनेक नकारात्मक भूमिका साकारल्या आणि लोकांच्या मनात स्थान निर्माण केले. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून टेलिव्हिजनवरील कोमोलिका म्हणजेच उर्वशी ढोलकिया आहे. हीने घटस्फोटानंतर आपल्या दोन्ही जुळ्या मुलांना स्वतःच मोठे केले आणि आपली फसवणूक करणाऱ्या पतीच्या तोंडाकडेही तिने पाहिले नाही.
3/6

बऱ्याच काळानंतर उर्वशी ढोलकिया पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बाबींमुळे चर्चेत आली. नुकतंच, या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिची जुळी मुले क्षितीज आणि सागर तसेच तिच्या घटस्फोटाबद्दल बरेच खुलासे केले आहेत. 'हाउटरफ्लाय'च्या मुलाखतीत, तिने वयाच्या 16 व्या वर्षी लग्न केले आणि दोन वर्षांनंतर केवळ 18 वर्षांची असताना घटस्फोट घेतला, असं ती म्हणाली.
4/6

'कसौटी जिंदगी की' मालिकेतील कोमोलिकाची भूमिका साकारण्यासाठी उर्वशीने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि तिने एकटीनेच आपल्या मुलांचा सांभाळ केला असल्याचे तिने सांगितले. मुलाखतीत उर्वशीने सांगितले की तिची जुळी मुले क्षितीज आणि सागर यांनी कधीही त्यांच्या वडिलांबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही.
5/6

6/6
