Photo: शरद केळकर ते अमोल कोल्हे 'या' कलाकारांनी गाजवली शिवरायांची भूमिका; पण एक नाव विसरताय...पाहा

Shiv Jayanti 2025: संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज'. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. आज त्यांची 349वी जयंती (तारखेनुसार) शिवप्रेमी उत्साहाने साजरी करत आहेत. 

Feb 19, 2025, 16:07 PM IST
1/7

शिवरायांनी क्रूर मुघल राज्यकर्त्यांना मात देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या लढ्याच्या आणि शौर्याच्या कथा आपण अनेक मालिकांमधून पाहत आलो आहोत. कित्येक चित्रपटांमध्येही शिवरायांचा इतिहास आपण पाहिला आहे. तुम्हाला माहित आहे का? अक्षय कुमार ते रितेश देशमुखपर्यंत अनेकांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे. जाणून घ्या, आजवर कोण कोणत्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली?

2/7

भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'छत्रपती शिवाजी' या कृष्णधवल चित्रपटात अभिनेता चंद्रकांत मांढरे यांनी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीत पाहिल्यांदाच चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती, या भूमिकेसाठी त्यांचं नाव कधीच विसरून चालणार नाही.   

3/7

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या तानाजी चित्रपटात शरद केळकर यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. 'तानाजी' चित्रपटामधील शरद केळकर यांचा पहिला लुक समोर आल्यानंतर शिवप्रेमींना चांगलाच पसंत पडला होता.  

4/7

'मी शिवाजी राजे भोसले' बोलतोय हा अविस्मरणीय चित्रपट आजही चाहत्यांच्या अंगावर रोमांच उभे करतो. या चित्रपटात अभिनेता महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. महेश मांजरेकरांची ही भूमिका लोकांना खूप आवडली होती.  

5/7

फक्त चित्रपटांमध्ये नाही तर टी. व्ही. मालिकांमधीलही शिवरायांच्या शौर्याची कथा लोकांसमोर मांडली आहे. हेमंत देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'राजा शिव छत्रपती' या मालिकेत अमोल कोल्हे यांनी महाराजांची भूमिका साकारली होती.  

6/7

अभिनेता चिन्मय मांडलेकरने 'सुभेदार' या ऐतिहासिक चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याशिवाय अनेक चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका साकारल्या होत्या. चिन्मय मांडलेकरांना त्या भूमिकेत पाहून चाहते नेहमीच भावुक होतात.  

7/7

येत्या काळात रितेश देशमुख देखील 'राजा शिवाजी' चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तेव्हा आता त्याची भूमिका प्रेक्षकांना कितपत भावते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल.