2 मुलांची आई, वयाच्या 46व्या वर्षी व्यायाम, दागिने विकून सुरु केली जिम... आज आहे फिटनेस गुरु

Fitness Guru Kiran Dembla : फिटनेस क्षेत्रात किरन डेंबला हे नाव आज प्रचंड लोकप्रिय झालंय. वयाच्या 46 वर्षी किरन डेंबलाने व्यायाम सुरु केला आणि आज ती या क्षेत्रातील फिटनेस गुरु बनली आहे. आज अनेक महिलांची ती प्रेरणास्थान बनली आहे.   

राजीव कासले | Jan 31, 2024, 21:44 PM IST
1/7

किरण डेंबला (Kiran Dembla) हे नाव आज फिटनेस क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. किरणची ओळख आता हॉटेस्ट फिटनेस गुरु अशी बनली आहे. अनेक सेलिब्रेटिंना किरण फिटनेसची ट्रेनिंग देते 

2/7

किरण डेंबला ही हैदराबादमध्ये राहते. दक्षिणते अनेक सेलिब्रेटी जसे तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना फिटनेसच्या टीप्स किरण डेंबला देते.

3/7

किरण डेंबला हिचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला. पण लग्न होऊन ती हैदराबादला आली. लग्नानंतर तीला दोन मुलं झाली आणि ती पूर्णपणे चूल आणि मूल याच्यात अडकून गेली.

4/7

सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक तिच्या आयुष्यात एक घटना घडली. तिच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या. उपचारानंतर ती बरी झाली. पण यादरम्यान तिचं वजन भरपूर वाढलं. वाढलेलं वजन कमी करण्याचा निश्चय तीने केला.

5/7

2007 मध्ये किरणने जिम आणि योगा क्लास सुरु केले. सहा-सात महिन्यातच तीने तब्बल किलो वजन कमी केलं. पण इतक्यावरच ती थांबली नाही. तीने आपलं शरीर पीळदार बनवलं. आणि त्यानंतर तीने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सहभागी व्हायला सुरुवात केली.

6/7

या दरम्यान किरणने हैदराबादमध्येच फिटनेस ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला.  इतर घरगुती महिलांना याचा लाभ व्हावा यासाठी तीने आपले दागिने विकून स्वत:ची जिम सुरु केली.

7/7

2013 साली बुडापेस्टमध्ये झालेल्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये किरण डेंबलाने भारताचं प्रतिनिधित्व केलं. या स्पर्धेत तिचा सहावा क्रमांक आला. तिची कठोर मेहनत आणि इच्छाशक्तीचा तिच्या कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे. किरण डेंबलाचा हा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे.