समस्या अनेक उत्तर एक... हिरवी मिरची! आरोग्याला होणाऱ्या फायद्यांची यादी एकदा पाहाच

Health Benefits Of Green Chilli: आपल्यापैकी अनेकजण जवळजवळ रोजच स्वयंपाकामध्ये हिरवी मिरची वापरतात. जेवणाला तिखटपणा आणण्यासाठी आणि चव वाढवण्यासाठी संपूर्ण हिरवी मिरची किंवा मिरचीचं वाटण अनेकजण रोज वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. मात्र तुम्हाला ठाऊक आहे का ही रोजच्या वापरातील हिरवी मिरची ही आरोग्यासाठी फार फायद्याची असते. हिरव्या मिरचीचे फायदे वाचून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल यात शंका नाही. जाणून घेऊयात याचसंदर्भात...

| Aug 24, 2023, 17:46 PM IST
1/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

हिरवी मिरची ही लाल मिरचीच्या तुलनेत आरोग्यासाठी अधिक फायद्याची असते असं मानलं जातं. हिरव्या मिरचीमध्ये अनेक पोषक तत्वं आणि घटक असतात ज्याचा फायदा शरीराला होतो. आरोग्यासंदर्भातील 5 महत्त्वाच्या समस्या रोज हिरवी मिरची खाल्ल्याने दूर होऊ शकतात. या समस्या कोणत्या आणि हिरवी मिरची त्यावर कसा रामहबाण उपाय आहे हे पाहूयात...

2/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

1) हिरवी मिरची खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. हेल्थलाइनच्या अहवालामध्ये मिरचीमधील कॅप्साइसिन नावाच्या घटकामुळे भूक कमी करतं आणि शरीरामधील चरबी कमी करण्यास फायदायचं ठरतं.

3/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

कमी भूक लागणे आणि चरबी कमी होत असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. 10 ग्राम मिरची खाल्ल्याने महिला आणि पुरुषांना चरबी कमी करण्यासाठी मदत होते, असं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे.

4/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

2) हिरवी मिरची ही नैसर्गिक पेन किलर आहे असं मानलं जातं. मिरचीमध्ये असलेल्या कॅप्साइसिन घटकामुळे शरीरातील वेदना कमी होण्यास मदत होते. कॅप्साइसिनचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि वेदना कमी होतात.

5/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

हिरवी मिरची अॅसिडीक रिफ्लेक्समुळे होणाऱ्या हार्टबर्नची म्हणजेच हृदयामध्ये जळजळ होण्याची समस्याही दूर करण्यास फायद्याची असते. एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की, रोज 2.5 ग्राम मिरची खाल्ल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या 5 आठवड्यांमध्ये कमी झाली.

6/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

3) लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची खाणं हे हृदयाच्या आरोग्यासाठीही फायद्याचं असतं. अनेक संशोधनांमध्ये ही माहिती समोर आली आहे. हिरव्या मिरचीचं सेवन केल्याने शरीरामधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. या माध्यमातून रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. 

7/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदय सुदृढ राहते. हृदयासंदर्भातील विकारांची समस्येचा धोकाही मोठ्याप्रमाणात कमी होतो. हृदयासंदर्भातील आजारांचा धोका कमी करण्यासाठी मिरचीचं सेवन केलं जातं.

8/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

4) हिरवी मिरची मधुमेहाच्या रुग्णांसाठी फारच फायद्याची मानली जाते. हिरवी मिरची खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. एका संशोधनामध्ये ही माहिती समोर आली आहे.

9/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

हिरव्या मिरचीमधील कॅप्साइसिन रसायन इन्शूलिनचं उत्सर्जन वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे रक्तामधील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

10/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

हिरवी मिरची मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत करत असली तरी तिच्या सेवनासंदर्भात आपल्या  डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेतल्यानंतरच निर्णय घेणं फायद्याचं ठरतं.

11/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

5) हिरवी मिरची खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदा होतो. हिरव्या मिरचीमध्ये कॅरोटिन आणि व्हिटॅमिन सीचं म्हणजेच क जीवनसत्वाचं प्रमाण अधिक असतं. 

12/12

health tips 5 great benefits of eating green chilli everyday

बीटा कॅरोटिन एक उत्तम अॅण्टीऑक्सीडंट आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते. क जीवनसत्वामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.