TMKOC: बबितापेक्षाही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, आता साडीमुळे पुन्हा चर्चेत

तारक मेहतामधील रिटा रिपोर्टरचा साडीतील लूक व्हायरल

Sep 01, 2022, 17:49 PM IST

तारक मेहता का उल्टा चष्मा ( Tarak Mehta ka Oolta Chashma) ही मालिका प्रचंड आवडीनं पहिली जाते. या मालिकेत रिटा रिपोर्टर नावाचं पात्र प्रिया अहुजा निभावते. प्रियाचं इन्स्टा पाहिलं तर ती किती स्टायलिश, ग्लॅमर्स आणि बोल्ड आहे याचा अंदाज येऊ शकतो 

 

1/5

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका घराघरात पोहोचली आहे. यातील सर्वच पात्र उत्तम अभिनय करतात आणि त्यांनी आपलं मनही जिंकलं आहे . यामध्ये रिटा रिपोर्टर नावाचं पात्र प्रिया अहुजा निभावते. या पात्रालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

2/5

प्रिया अहुजा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते, या मालिकेमुळे तिचे फॅन्सही प्रचंड वाढले आहेत. म्हणूनच तिचे पोस्ट प्रचंड व्हायरल होत असतात. आता नुकतेच प्रियाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्रियाने ट्रॅडिशनल साडी नेसली आहे. 

3/5

गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थीच्या आधी हरतालिका असते. खास हरतालिकेसाठी प्रियाने साडी नसल्याचं समजतंय. प्रियाने बिना ब्लाउज ही साडी छान कॅरी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

4/5

तिच्या या फोटोंना प्रचंड प्रेम मिळतंय. मात्र सोबतच प्रियाने बिना ब्लाउज साडी कॅरी केली असल्याने तिच्या फॅन्सचं त्यावर अधिक लक्ष जातंय. कपाळावर तिने केवळ मांग टीका (मोठी बिंदी) वापरली आहे. याशिवाय तिने कोणताही मेकअप केलेला नाही आणि ज्वेलरीही वापरलेली नाही.

5/5

प्रिया अहूजा अतिशय स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिचं इंस्टाग्राम हॅन्डल. फॅशनच्या तिने बबिताला म्हणजेच मुनमुन दत्तालाही मागे टाकलंय असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही.