ICC World Cup 2011: हाच तो दिवस, 12 वर्षापूर्वी जेव्हा टीम इंडियाने World Cup जिंकला; कुठंय ते प्लेयर्स?
12 years Of ICC World Cup 2011: टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये दणक्यात विजय नोंदवला. अखेरच्या सामन्यात श्रीलंका धुळ चारत भारताने (IND vs SL Final) वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या वर्ल्ड कपमधील खेळाडू आत्ता काय करतात? माहितीये का?
ICC World Cup 2011: भारताच्या गल्लोगल्लीत शांतता पसरली होती अन् टीव्हीसमोर घोळकाच्या घोळका. श्रीलंका आणि भारत यांच्यात फायनल सामना सुरू होता. युवराज सिंह आणि महेंद्रसिंह धोनी ही स्टार जोडी मैदानात होती. त्याचवेळी धोनीने कुलसेकराच्या चेंडूवर सिक्स मारला आणि एकच जल्लोष सुरू झाला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप फायनलमध्ये दणक्यात विजय नोंदवला. अखेरच्या सामन्यात श्रीलंका धुळ चारत भारताने (IND vs SL Final) वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या वर्ल्ड कपमधील खेळाडू आत्ता काय करतात? माहितीये का?
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573303-wc11-1.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573302-wc11-2.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573301-wc11-3.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573300-wc11-4.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573299-wc11-5.png)
युवराज सिंह वर्ल्ड कप 2011 चा विषय चाललाय आणि युवराजचं नाव येणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही. युवराज सिंहने त्याच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर भारताला वर्ल्ड कर जिंकून दिला. 9 सामन्यात 380 धावा केल्या आणि 15 विकेट्सही घेतल्या होत्या. भारत सामना गमावेल, अशी ज्यावेळी शक्यता होती, तेव्हा युवराज मैदानात भक्कमपणे उभा राहिला. कॅन्सरचा आहे माहित असताना देखील युवराज देशासाठी खेळला. त्यामुळे आजही भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573298-wc11-6.png)
एस एस धोनी मुळता युवराजची फटकेबाजू सुरू असल्याने धोनीची बॅट जास्त वर्ल्ड कपमध्ये चालली नाही. मात्र, अखेरच्या सामन्यात धोनीने रौद्ररुप दाखवत श्रीलंकेविरुद्ध दमदार खेळी केली. धोनीने 79 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 91 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याचा अखेरचा षटकार आजही अनेकांच्या नजरेत भरलेला आहे.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573297-wc11-7.png)
सुरेश रैना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रैनाने 28 चेंडूत नाबाद 34 धावा केल्या आणि युवराज सिंगसोबत 74 धावांची सामना विजयी भागीदारी केली होती. तर फिल्डिंगच्या बाबतीत रैनाचा हात कोणीच धरू शकलं नाही. रैनाने 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573296-wc11-8.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573295-wc11-9.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573294-wc11-10.png)
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/04/02/573293-wc11-11.png)