तुमचं मानसिक आरोग्य चांगलंय की बिघडलंय? 'या' पद्धतीनं ओळखालं

Symptoms Of Good Mental Health : आपण नेहमी आनंदी रहातो म्हणजेच आपलं मानसिक आरोग्य चांगलं असं नाही, कित्त्येदा आपल्या मनात काय चालु अस्त हे स्वता:ला समजत नाही.  

Feb 29, 2024, 14:13 PM IST
1/8

तुमचं मानसिक आरोग्य चांगलंय का?

आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं असावं, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र, चांगलं मानसिक आरोग्य असणं म्हणजे काय, हेच कित्येकांना माहिती नसतं. अनेकांना असं वाटतं की, आपण आनंदी असणंम्हणजेच आपलं मानसिक आरोग्य चांगलं असण्याचे निकष आहेत, मात्र, तसं नाहीये. मानसिक आरोग्य चांगलं असणं ही फार वेगळी गोष्ट आहे.  

2/8

हे तुम्ही कसं ठरवाल?

ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपण भावनिक दृष्ट्या लवचिक असतो आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्याची आपली क्षमता त्याद्वारे निश्चित होते. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं आहे की बिघडलेलं आहे, हे तुम्ही कसं ठरवाल? तर आम्ही चांगल्या मानसिक आरोग्याची काही लक्षणे सांगितली आहेत, ती तुमच्या मानसिकेतला जुळतात की पडताळून पहा, तुम्हाला आपोआप समजेल.    

3/8

भावनिक बुद्धिमत्ता :

वेगवेगळ्या भावना अनुभवायला येणं ही गोष्ट फारच सामान्य आहे. परंतु चांगल्या मानसिक आरोग्यामध्ये या भावनांचे प्रभावीपणे व्यवस्थापन आणि नियमन करण्याची क्षमता देखील समाविष्ट असते. याचा अर्थ भावना कोणतीही असो मात्र, सामान्यतः सकारात्मक दृष्टीकोन असणे, आनंद, हशा अनुभवणे आणि भावनिकदृष्ट्या स्थिर वाटणं हे यामध्ये सामील आहे.  

4/8

लवचिकता आणि सामना करण्याची कौशल्ये (Resilience and coping skills)

चांगलं मानसिक आरोग्य असणं म्हणजे अनेकदा अडचणीतून मार्ग काढणं, तणावाचा सामना करणं आणि बदलांशी जुळवून घेणं होय. यामध्ये समस्या सोडवण्याची प्रभावी कौशल्ये असणं, लवचिकता असणं आणि आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याची भावना असणं या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

5/8

स्वत:विषयी चांगलं मत असणं आणि आत्म-सन्मान असणं :

स्वत:विषयी चांगलं मत असणं आणि आत्म-सन्मान असणं या दोन्हीही गोष्टी चांगल्या मानसिक आरोग्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे. यात तुमचं स्वतःचं मूल्य ओळखणं, तुमच्या क्षमतेवर विश्वास असणं आणि सकारात्मक अशी स्व-प्रतिमा स्वत:च्याच मनात असणं या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी वरकरणी छोट्या वाटत असल्या तरी याच आपल्या मानसिक आरोग्यात फार महत्त्वाच्या ठरतात.  

6/8

प्रोडक्टीव्हीटी आणि मोटीव्हेशन :

चांगले मानसिक आरोग्य अनेकदा वेगवेगळ्या ऍक्टीव्हीटींमध्ये गुंतण्यासाठी, ध्येय निश्चित करण्यासाठी आणि ते साध्य करण्यासाठी मदत करतं. तसेच अधिक प्रोडक्टीव्ह होण्यासाठी ऊर्जा देतं, लक्ष केंद्रित करायला मदत करतं आणि मोटीव्हेटही करतं. यात तुमचे काम, छंद आणि दैनंदिन जीवनात समाधान आणि उद्देश शोधणं देखील समाविष्ट आहे.  

7/8

सकारात्मक विचारसरणी :

चांगले मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याशी फारच जवळून जोडलेले असते. यामध्ये नियमित, शांत झोप असणं, संतुलित आहार राखणं, नियमित शारीरिक हालचाली करणं आणि आपल्या एकूण शारीरिक आरोग्याची काळजी घेणं यांचाही समावेश होतो.

8/8

निष्कर्ष :

चांगल्या मानसिक आरोग्यामध्ये जीवनाबद्दल सकारात्मक आणि वास्तववादी दृष्टीकोन असतो. यात नकारात्मक विचारांना आव्हान देण्यास सक्षम असणं सामील असतं. तसेच स्वत:बद्दल करुणा बाळगणं, चांगला आशावाद राखणं आणि आयुष्याबद्दल कृतज्ञतेची भावना राखणं देखील समाविष्ट आहे. चांगलं मानसिक आरोग्य ही काही एखादी स्थिर स्थिती नसते, जी कायमस्वरुपी आहे तशीच राहते. प्रत्येकजण चढ-उतार अनुभवतो. या चढ-उतारामध्येच स्वत:ची मानसिकता हेल्दी पद्धतीने राखणं याला चांगलं मानसिक आरोग्य असं म्हणतात. त्यासाठी वरील सर्व निकष तुम्हाला उपयोगी पडतील.