GK Knowledge : असे कोणते 6 पदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्यावर विष बनतात?

हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल की, तुम्ही खात असलेले 6 पदार्थ पुन्हा गरम केल्यावर चक्क विष बनतं. तुम्ही विचार करत असाल असे कोणते पदार्थ आहेत. 

| Nov 04, 2024, 12:37 PM IST

आपल्या जगण्याशी निगडीत अनेक गोष्टी आपल्याला माहित नाही. घरचा आहार हा सर्वोत्तम आहार म्हणून खाल्ला जातो. पण तुम्हाला कल्पना आहे की, तुम्ही खात असलेले पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यावर त्याचे विष बनते. 

1/8

अनेकदा जनरल नॉलेजशी संबंधित प्रश्न आपल्याला माहिती नसतात. अशावेळी आपलं अज्ञान आपल्या आरोग्यासाठी घातक ठरते. असे कोणते 6 पदार्थ आहेत जे रिहिट केल्यावर म्हणजे पुन्हा गरम केल्यावर आरोग्यासाठी घातक ठरतात?

2/8

बटाटा

बटाटा हा पदार्थ पुन्हा एकदा गरम केल्यावर त्यातील पोषण तत्वे संपून जातात. हा पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा गरम करुन खाणे आरोग्यासाठी घातक असते. 

3/8

भात

अनेक घरांमध्ये भात आवर्जून खाल्ला जातो. पण हाच भात पुन्हा गरम केल्यावर त्यातील प्रोटीन संपून जातात. 

4/8

अंड

अंडी पुन्हा एकदा हाय तापमानावर गरम केले तर ते विषारी होते. यामुळे पचनक्रिया खराब होते आणि पोट गडबडते. 

5/8

पालक

पालकमध्ये नायट्रेट आणि आर्यन भरपूर प्रमाणात असते. दोनदा गरम केल्यामुळे त्याचे रुपांतर नायट्रेट कॅन्सरमध्ये होते. त्यामुळे पालक किंवा पालकाचे पदार्थ पुन्हा गरम करुन खाऊ नये. 

6/8

बीट

पालकाप्रमाणेच बीटमध्ये देखील नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. अशावेळी ते गरम करुन खाणे देखील शरीरासाठी घातक असते. 

7/8

चिकन

चिकनमध्ये पौष्टिकता असते. पण हा पदार्थ खूप वेळा गरम केला तर त्यामुळे फूड पॉइजनिंग होण्याची दाट शक्यता असते. 

8/8

मशरुम

मशरुम हा पदार्थ देखील चिकनप्रमाणे आहे. शाकाहारी लोकांमध्ये चिकनप्रमाणे पौष्टिक गुणधर्म असावेत त्या उद्देशाने मशरुम खाल्ला जातो. पण हा पदार्थ रिहिट केल्यावर त्यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकतो.