Indian Railway देतेय कमीत कमी पैशात परदेशवारीची संधी; 'इथं' सहलीला जा, वर्षाचा शेवट अविस्मरणीय करा

कधी, कुठे आणि कसं पोहोचायचं? IRCTC कडून नेमकी कुठे फिरायला जाण्याची संधी दिली जातेय?   

Dec 02, 2024, 14:35 PM IST

सुट्ट्या घेण्याच्या बेतात असाल तर , रेल्वे विभाग तुम्हाला देतोय सुवर्णसंधी. देशाच्या सीमा ओलांडून नेमकं कुठं फिरून यायचंय? पाहा.... 

1/8

सुट्ट्यांचा माहोल

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

IRCTC Tour Package: सध्या सुट्ट्यांचा माहोल आहे. 2024 या वर्षाचा शेवट समोर असतानाच कैक मंडळी त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत कुटूंबाला वेळ देताना दिसत आहेत. 

2/8

भारतीय रेल्वे

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

IRCTC Tour Package: या सर्व मंडळींसाठी भारतीय रेल्वेनं एक कमाल ऑफर आणली आहे. ज्याअंतर्गत खिशाला परवडणाऱ्या दरात तुम्हाला परदेशवारीची संधी मिळणार आहे. 

3/8

टुरिस्ट पॅकेज

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

IRCTC Tour Package: भारतीय रेल्वेच्या अख्तयारित येणाऱ्या आयआरसीटीसीकडून आणखी एका कमाल टुरिस्ट पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. आता देशांतर्गतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सफरीवर ही संस्था पर्यटकांना नेणार असून, त्यांना एक कमाल संधी देणार आहे. 

4/8

नेपाळ भ्रमंती

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

IRCTC  कडून दिली जाणारी ही संधी आहे, नेपाळ भ्रमंतीची. नैसर्गिक सौंदर्यानं नटलेल्या या देशातील बर्फाच्छादित पर्वतरांगा, तेथील संस्कृती, जनजीवन आणि इतर कैक गोष्टी जवळून पाहण्याची संधी या पॅकेजमध्ये मिळत आहे. 

5/8

6 दिवस आणि 5 रात्री

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या या नेपाळ देशात भेट देण्यासाठी आयआरसीटीसीनं आखलेला हा बेत 6 दिवस आणि 5 रात्रींसाठी असून, या पॅकेजचं नाव आहे BEST OF NEPAL EX DELHI. 

6/8

पर्यटनस्थळ

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

या पॅकेजअंतर्गत प्रवाशांना बौधनाथ स्तूप, पशुपतिनाथ मंदिर, बुधनीलकंठ, मनोकामना मंदिर, विंध्यवासिनी मंदिर, सुरंगकोट, डेविल फॉल्स, गुप्तेश्वर महादेव मंदिर अशा पर्यटनस्थळांवर भेट देण्याची संधी मिळेल. संपूर्ण सहलीदरम्यान 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची संधी असेल, शिवाय ब्रेकफास्ट आणि रात्रीच्या जेवणाचा अर्थात डिनरचा खर्च या सहलीच्या एकूण खर्चात समाविष्ट असेल. 

7/8

गाईड

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

संपूर्ण प्रवासादरम्यान इंग्रजी आणि हिंदीभाषिक गाईड प्रवाशांसोबत फिरणार असून, त्यांना या देशाची सफर घडवणार आहे. 22 डिसेंबर 2024 रोजी या प्रवासाची सुरुवात होणार असून, पर्यटक दिल्लीहून थेट काठमांडू इथं पोहोचतील. 

8/8

खर्च

IRCTC Tour Package Nepal trip package cost details

एकट्यानं या भ्रमंतीसाठी निघणार असाल तर तुम्हाला  ₹ 49000 इतका माणसी खर्च येईल. दोन किंवा तीनजणांचा गट सहलीसाठी जाणार असाल तर, अनुक्रमे ₹ 40000, ₹ 39600 इतका माणसी खर्च येईल. सहलीमध्ये 5 ते 11 वर्षे वयोगटातील लहान मुलं असल्यास त्यांचा खर्च प्रत्येकी ₹ 36500 इतका असेल. सविस्तर माहितीसाठी इच्छुकांनी आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाव भेट द्यावी.