Coastal Regulation Zone : समुद्रकिना-यावरील शेकडो बांधकामं नियमित होणार; बिल्डर्सचा मोठा फायदा
Coastal Regulation Zone : सीआरझेडच्या नियमात बदल झाल्यामुळे समुद्रकिना-यावरील अपुर्णावस्थेतील प्रकल्प देखील मार्गी लागणार आहेत. एकीकडे केंद्राने सीआरझेडमध्ये बदल करत एसएसआय वाढवला असला तरी दुसरीकडे पर्यारणप्रेमींनी मात्र या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
Coastal Regulation Zone : सीआरझेड संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रानं सीआरझेडच्या नियमात बदल केले आहेत. आता बांधकामासाठी 1 ऐवजी 2.2 किंवा 4 पर्यंत एफएसआय मिळेल. त्यामुळे समुद्रकिना-यावरील अनेक बांधकामं नियमित होणार आहेत. मुंबईत अशा 85 हजार इमारती आहेत ज्या सीआरझेडच्या नियमात बसत नव्हत्या. या इमारती देखील नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.