परभणीत महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ; पावणे सहाशे घटनांची पोलिसांत नोंद

Apr 10, 2023, 19:42 PM IST
1/5

parbhani news

परभणी जिल्ह्यात महिलांवरील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या पावणे सहाशे घटनांची नोंद परभणीच्या विविध पोलीस ठाण्यात झाली आहे.

2/5

parbhani domestic voilince

यामध्ये सासरच्या मंडळींकडून होणारा कौटुंबिक छळ, बलात्कार, खून, विनयभंग, अपहरण,आत्महत्येस प्रवृत्त करणे, हुंडाबळी सारख्या गंभीर गुन्ह्याचा समावेश असल्याचे आकडेवारी वरून दिसत आहे.

3/5

parbhani crime rate

यामध्ये खुनाचे 12, खुनाच्या प्रयत्नाचे 31,बाललैंगिक अत्याचाराचे 31, बलात्काराचे 26,अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन 33,विनयभंगाचे 96 गुन्हे, हुंडाबळी 498 अ भादंविनुसार 278, कलम 363 भादंविनुसार 61 गुन्हे दाखल आहेत.  

4/5

parbahni Women empowerment

महिला सबलीकरणासाठी राज्यभरात विविध कार्यक्रम राबविले जात असतांना प्रत्यक्षात मात्र महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यास अपयश येत असल्याचे चित्र आहे.

5/5

parbhani child marriage

दुसरीकडे परभणीमध्ये बालविवाहांचे प्रमाणही जास्त आहे. सर्रासपणे बालविवाह लावण्यात आल्याच्या घटना अनेकदा घडल्याचे समोर आले आहे. अनेक संस्थांकडून बालविवाह रोखण्याचे प्रयत्न केले जात असले तरी याला अद्याप पूर्णपणे यश आलेले नाही.