स्वप्न पूर्ण होणार, लहान कुटुंबासाठी स्वस्त कार, किंमत फक्त 2.48 लाख रुपये

तुम्ही आतापर्यंत अनेक महागड्या कार देखील ऐकलं असेल पण आज आम्ही तुम्हाला सर्वात स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. 

| Nov 17, 2024, 15:59 PM IST
1/7

Qute

देशातील सर्वात स्वस्त कार Qute आहे. खरं तर ही एक क्वाड्रिसाइकिल आहे. मात्र, तिचा लूक हा एखाद्या कार सारखा आहे. 

2/7

2.48 लाख रुपये

ही कार बजाज ऑटोने तयार केली आहे. क्वाड्रिसाइकिल ही कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये आहे. तिची किंमत 2.48 लाख रुपये आहे. तर यामधील CNG कारची किंमत 2.78 लाख रुपये आहे. 

3/7

टॉप व्हेरियंटची किंमत

त्याचबरोबर Qute च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरुम किंमत 3.3 लाख रुपये असून त्यामधील टॉप व्हेरियंट कारची किंमत 3.31 लाख रुपये आहे.   

4/7

लूक

क्वाड्रिसाइकिल ही कार नॅनो कार सारखी दिसते. त्यासोबतच ही कार हार्ड रुफ आणि Zx2 सिटिंग कॉन्फिगरेशनसह येते. 

5/7

इंजिन

या कारचे इंजिन 216cc ऑटो रिक्षा ऐवढे आहे. जे जास्तीत जास्त 13.1 PS पॉवर आणि 18.9 NM टॉर्क जनरेट करते. 

6/7

वेग

कंपनीचा दावा आहे की Qute कारचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. 

7/7

अॅव्हरेज

कंपनीचा दावा आहे की ही कार सीएनजीमध्ये 50 किलोमीटर तर पेट्रोलवर 34 किलोमीटर आणि एलपीजीवर 21 किलोमीटर अॅव्हरेज देते.