का विकावी लागलेली एअर इंडिया कंपनी? टाटांनी पुन्हा कसा मिळवला ताबा? आजच्या दिवशी 92 वर्षांपूर्वी...

भारतामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या सेवेविषयी कायम कुतूहलानं बोललं जातं. अशा या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीविषयी तुम्ही जाणता....?   

Oct 15, 2024, 12:49 PM IST

Tata Success Story: टाटा एअरलाईन्स.... अर्थात आजचं एअर इंडिया. विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या यादीत मानानं घेतलं जाणारं एक नावं. 

1/9

विमानसेवा

Tata Success Story journey of tata airlines to air india

Tata Success Story: 15 ऑक्टोबर 1932 म्हणजेच साधारण 92 वर्षांपूर्वी टाटा उद्योग समुह आणि संपूर्ण भारतासाठी एक गौरवास्पद दिवस होता. कारण, याच दिवशी पहिल्या भारतीय विमानसेवा पुरवणाऱ्या कंपनीचं विमान आकाशात झेपावलं होतं. कराची ते मुंबई असा हा विमानप्रवास खुद्द जेआरडी टाटा यांनी केला होता. 

2/9

जेआरडी टाटा

Tata Success Story journey of tata airlines to air india

भारतातील पहिलेवहिले कमर्शिअल पायलट जेआरडी टाटा यांनी टाटा समुहात कैक वर्षे अध्यक्षपद भूषवलं. त्यांना भारतातील नागरी उड्डाणाच्या क्षेत्राचे जनकही म्हटलं जातं. 

3/9

स्वप्न

Tata Success Story journey of tata airlines to air india

पहिल्यांदा फ्रान्सच्या हार्डेलॉट समुद्रकिनाऱ्यावर विमानाचं लँडिंग पाहिल्या क्षणापासून आपल्याला विमानावर विशेष प्रेम जडलं असं जेआरडींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या क्षणापासूनच त्यांनी आपण वैमानिकच व्हायचं हे स्वप्न पाहिलं. 

4/9

कराचीहून मुंबई व्हाया अहमदाबाद

Tata Success Story journey of tata airlines to air india

15 ऑक्टोबर 1932 मध्ये त्यांनी तत्कालीन टाटा एअरवेजच्या सिंगल इंजिन असणाऱ्या हेविलँडनं कराचीहून मुंबई व्हाया अहमदाबाद असा प्रवास केला. हे एक तिय़घांची आसनक्षमता असणारं विमान असून, 1929 आणि 1933 दरम्यान हेविलँड कंपनीद्वारे तयार करण्यात आलं होतं. 

5/9

अध्यक्षपद

Tata Success Story journey of tata airlines to air india

भारत स्वतंत्र झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एअर इंडियाचं राष्ट्रीयिकरण केलं. ज्यानंतर जेआरडी टाटा एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 

6/9

निर्णय

Tata Success Story journey of tata airlines to air india

दशकानुदशकं ही विमानसेवा पुरवणारी कंपनी सरकारी अख्तयारित असल्यामुळं कर्जाचा डोंगर वाढला. 50 हजार कोटींहून अधिक कर्ज असल्यामुळं या एअरलाईनची विक्री करण्याचा निर्णय शासनानं घेतला. 

7/9

सर्वात मोठी बोली

Tata Success Story journey of tata airlines to air india

टाटा ग्रुपवर सर्वात मोठी बोली लावल्यानंतर जानेवारी 2022 मध्ये ही विमानसेवा कंपनी अधिकृतपणे टाटा समुहाच्या हाती आली. 

8/9

Welcome Back Air India

Tata Success Story journey of tata airlines to air india

TATA Group नं ही बोली जिंकल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष रतन टाटा यांनी आनंदाच्या भरात एक पोस्टही केली होती. जिथं त्यांनी , Welcome Back Air India असं लिहिलं होतं. 

9/9

ग्राहकांशी खास नातं

Tata Success Story journey of tata airlines to air india

एअर इंडियाशी प्रवाशांचं एक खास नातं असून, टाटा समुहानं कायमच हे नातं जपण्यासाठी आणि ते अधिक वृद्धिंगत होण्यासाठीच प्रयत्न केले असं म्हणणं गैर ठरणार नाही.