आज पुन्हा स्वस्त सोनं खरेदीची संधी, खुली झालीय सरकारी स्कीम

Jan 13, 2021, 13:56 PM IST
1/6

स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी

स्वस्त दरात सोनं खरेदीची संधी

भारतीय रिजर्व बैंक (Reserve Bank of India) ने यावेळेस सॉवरेनट गोल्ड बॉन्ड ची इश्यू किंमत (Issue Price) 5,104 रुपये प्रति ग्राम ठरवली आहे. RBI ने 8 जानेवारीला यासंदर्भातील घोषणा केली. आजपासून याचे सब्सक्रिप्शन खुले झालंय.  19 जानेवारीपर्यंत या इश्यूचे सेटलमेंट होईल.

2/6

ऑनलाइन पेमेंटवर 500 रुपयांची बचत

ऑनलाइन पेमेंटवर 500 रुपयांची बचत

तुम्ही डि़जीटल पेमेंटच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 50 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत सवलत मिळेल. याचा अर्थ तुम्ही 1 ग्राम गोल्ड 5054 रुपयांपर्यंत खरेदी करु शकाल. 10 ग्रॅमसाठी तुम्हाला 50,540 रुपये मोजावे लागतील. म्हणजे 10 ग्रॅमच्या खरेदीवर तुम्हाला 500 रुपये डिस्काऊंट मिळू शकेल.

3/6

1 ग्रॅम सोनं गुंतवणुकीपासून सुरुवात

1 ग्रॅम सोनं गुंतवणुकीपासून सुरुवात

या स्किम अंतर्गत तुम्ही कमीत कमी 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोनं खरेदी करु शकता. Gold Bond मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला टॅक्समध्ये सवलत मिळू शकते. गोल्ड बॉंडमध्ये तुम्हाला सरकारकडून दरवर्षा 2.5 टक्के व्याज मिळतं. सोन्याच्या वाढत्या किंमतीसोबत तुम्हाला वेगळे व्याज देखील मिळते. या स्कीम अंतर्गत तुम्ही एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत गोल्ड बॉंड खरेदी करु शकता.

4/6

सॉवरेन गोल्ड बॉन्ड काय आहे?

सॉवरेन गोल्ड बॉन्ड काय आहे?

सॉवरेन गोल्ड ब्रॉन्ड  मध्ये गुंतवणूकदाराला प्रत्यक्ष रुपात सोनं मिळत नाही. हे फिजिकल गोल्डच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यास गोल्ड बॉंड सर्टिफिकेट (Gold Bond Certificate) दिले जाते आणि मॅच्योरीटी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदार काढून घेण्यास जातात तेव्हा त्यांना त्यावेळच्या सोन्याच्या दराप्रमाणे पैसे मिळतात.

5/6

कुठून खरेदी कराल Sovereign Gold Bond ?

कुठून खरेदी कराल Sovereign Gold Bond ?

तुम्हाला सॉवरेन गोल्ड बॉन्ड मध्ये गुंतवणूक करायची असल्याच PAN असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही सर्व कमर्शियल बॅंक (RRB, छोट्या फायनान्स बॅंक, पेमेंट बॅंक व्यतिरिक्त), पोस्ट ऑफीस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) किंवा थेट एजंटच्या माध्यमातून गुंतवणूक करु शकता.

6/6

मॅच्योरिटी पीरियड काय आहे ?

मॅच्योरिटी पीरियड काय आहे ?

ज्या गुंतवणूकदारांनी नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बॉंड आधी सब्सस्काइब केले होते त्यांना पाच वर्षांमध्ये साधारण 93 टक्के रिटर्न मिळालंय.हे बॉंड 8 वर्षात मॅच्योर होतात. पण गुंतवणूकदारांकडे पाच वर्षांनी गुंतवणूक काढण्याचा पर्याय असतो. सॉवरेन गोल्ड बॉंंड मोठ्या मोठ्या काळाची गुंतवणूक आहे.