Rahul Dravid B’day Special: राहुल द्रविडची न ऐकलेली लव्ह स्टोरी

Jan 11, 2021, 08:34 AM IST
1/8

टीम इंडियामध्ये त्याचे योगदान सर्वांनाच माहितेय. आज जन्मदिनी राहुल आणि त्याची बायको विजेता पेंढारकर यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊया.  

2/8

विजेताचे वडील इंडियन एयरफोर्समध्ये विंग कमांडर होते. त्यामुळे त्यांची बदली देशाच्या वेगवेगळ्या शहरात व्हायची. वडिलांच्या रिटार्टमेंटमेंटनंतर तिचा परिवार नागपूरला शिफ्ट झाला. विजेताने 2002 मध्ये सर्जरीत पोस्ट ग्रेजुएशनची डिग्री मिळवली.

3/8

विजेताच्या वडिलांची पोस्टिंग  1968-1971 दरम्यान बंगळूरमध्ये होती. यावेळी विजेताचा परिवार राहुल द्रविडच्या परिवाराच्या संपर्कात आले.

4/8

या दरम्यान राहुल आणि विजेता यांच्यातील मैत्री वाढली. दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.  

5/8

दोघांच्या परिवाराने 2002 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण पुढच्यावर्षी म्हणजे 2003 ला राहुलला वर्ल्डकप दौऱ्यावर जायचं होतं. म्हणून दोघांना लग्नासाठी वाट पहावी लागली.

6/8

वर्ल्डकपच्या आधी राहुल आणि विजेता यांनी साखरपुडा केला. यानंतर विजेता राहुलला चिअर्स करण्यासाठी दक्षिण आफ्रीकेला गेली होती. 

7/8

वर्ल्डकप दौऱ्याहून परतल्यानंतर 4 मे 2003 मध्ये बंगळूरला पारंपारिक रितीरिजावाजानुसार दोघांनी लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि विजेताचे लग्न आणि अरेंज मॅरेजचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.  

8/8

2005 मध्ये विजेता राहुलने आपला पहिला मुलगा समितला जन्म दिला. यानंतर 2009 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला. आज दोघेही आनंदी आयुष्य जगतायत.