हिमाचल, काश्मीर, शिमल्यात बर्फवृष्टी, पर्यटक लुटताय बर्फवृष्टीचा आनंद

| Jan 29, 2020, 08:21 AM IST
1/5

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बर्फवृष्टीमुळे सुंदर असं दृश्य पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे. पर्यटक याचा आनंद घेत आहेत.

2/5

हिमाचल प्रदेशातल्या चंबामध्ये देखील जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. तापमान सातत्यानं घसरत असून शीतलहरींमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. डलहौसी, काला टॉप, पांगी घाटी परिसरात बर्फवृष्टी होते आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे मुख्य मार्ग बंद आहेत. परिणामी स्थानिकांसह पर्यटकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे.

3/5

वैष्णोदेवी भवन पासून गुलमर्गपर्यंत जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. बर्फवृष्टीमुळे जवाहर बोगद्याजवळ वाहतूक तब्बल सहा तास बंद होती. खराब हवामानामुळे कटरा-सांझीछत हेलिकॉप्टर सेवा देखील खंडित झाली आहे.  

4/5

हिमाचल प्रदेशातल्या सिरमौरमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झालंय. मुख्य मार्गावर बर्फाचे थर साचल्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे.

5/5

शिमलामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. सगळीकडे बर्फाची चादर पसरल्याचं दिसून येतंय. हवामान विभागानं पुढील २४ तासांसाठी अलर्ट जारी केलाय. बर्फवृष्टीमुळे सिमल्यामधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. मात्र सिमल्यामध्ये पर्यटक बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटताना पहायला मिळतायत. पर्यटक बर्फात डान्स करताना दिसून येत आहे.