स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?

Why Young People Buying Dumb Phone: सध्या जगभरामध्ये एक अगदी आगळावेगळा आणि विचित्र ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. या ट्रेण्डमध्ये अनेक तरुण मुलं स्मार्टफोनऐवजी डम्ब फोनला प्राधान्य देताना दिसत आहेत. डम्ब फोन म्हणजे काय? त्याची मागणी एवढी का वाढत आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...

Swapnil Ghangale | Jun 19, 2024, 14:36 PM IST
1/7

Why Young People Buying Dumb Phone

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जनरेशन झेड कदाचित स्मार्टफोन तंत्रज्ञान अधिक वापरण्याऐवजी त्यापासून दूर जाईल. आपल्या मानसिक आरोग्याचा विचार करुन तसेच स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी जनरेशन झेड स्मार्टफोनकडे पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे.  

2/7

Why Young People Buying Dumb Phone

स्मार्टफोनच्या अगदी विरुद्ध असलेले म्हणजेच बेसिक फोनची विक्री पुन्हा वाढू लागली आहे. या बेसिक फोन्सला आता स्मार्टफोनच्या जगात 'डम्ब फोन्स' म्हणजेच संथपणे काम करणारे किंवा मार्यादित पर्याय देणारे फोन म्हणून ओळखलं जातं. हे मुळात 2000 सालाच्या सुरुवातीचं तंत्रज्ञान आहे.

3/7

Why Young People Buying Dumb Phone

या डम्ब फोनवरुन केवळ फोन कॉल आणि टेक्सट मेसेज करता येतात. जनरेशन झेडला भविष्यात कदाचित आपल्या फोन्सकडून एवढ्याच गोष्टी अपेक्षित असतील तर हे डम्ब फोन त्यांची पहिली पसंती असेल. याच डम्ब फोनचं अत्याधुनिक रुप म्हणजे फिचर्स फोन आहे. यामध्ये बेसिक फोनच अपडेट करुन त्यात रंगीत डिस्प्लेसहीत जीपीएस, हॉटस्पॉटसारखे काही अतिरिक्त फंक्शन्स देण्यात आले आहेत.

4/7

Why Young People Buying Dumb Phone

नोकिया कंपनीची मातृक कंपनी असलेल्या एचएमडी ग्लोबलच्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये मागील वर्षभरामध्ये डम्ब फोन्स आणि फिचर फोन्सची विक्री वाढली आहे. झेड जनरेशन दिवसभरातील 7.2 तास स्क्रीनसमोर घालवते. जनरेशन एक्सपेक्षा हा वेळ एक तास अधिक आहे.  

5/7

Why Young People Buying Dumb Phone

स्क्रीन टाइम अधिक असणं हे मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाही. तसेच शारीरिक आरोग्यावरही याचा परिणाम होतो. स्क्रीन टाइम अधिक असलेल्या मुलांमध्ये मानसिक समस्यांबरोबरच डिप्रेशनची समस्याही दिसून येते. तसेच स्क्रीन टाइम अधिक असलेल्या मुलांमध्ये स्थूलपणाची समस्याही प्राकर्षाने दिसून येते.  

6/7

Why Young People Buying Dumb Phone

मागील वर्षी जागतिक स्तरावरील स्मार्टफोनची विक्री 18 टक्क्यांनी कमी झाली. जगभरामध्ये मागील वर्षी 120 कोटी स्मार्टफोन विकले गेले, असं वर्ल्ड इकनॉमिक फोमरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

7/7

Why Young People Buying Dumb Phone

2013 नंतर पहिल्यांदाच जगातिक स्तरावर स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ही आकडेवारी नक्कीच बदलाचे संकेत देत असल्याचं म्हटलं जात आहे. तुम्हाला संधी दिली तर तुम्हाला असे डम्ब फोन वापरायला आवडतील का?