Skin Glow Tips: आंघोळीच्या पाण्यात 'हे' टाकल्यास त्वचा होईल चमकदार

| Jul 12, 2023, 11:06 AM IST
1/9

Skin Glow Tips: आंघोळीच्या पाण्यात 'हे' टाकल्यास त्वचा होईल चमकदार

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

Bath Tips: आपली त्वचा चमकदार असावी,त्यावर पिंपल्स नसावेत असे प्रत्येक तरुणीला वाटते. त्यामुळे तरुणी आपल्या त्वचेची खूप काळजी घेतात.  कधी मुसळधार पाऊस तर कधी कडक उन्हाचा थेट परिणाम त्वचेवर होतो. 

2/9

बदलत्या ऋतूचा त्वचेवर परिणाम

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

या बदलत्या ऋतूमुळे त्वचेवर अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. उन्हाळ्यात जसा सनबर्न आणि टॅनिंगची समस्या आपल्या सर्वांना पाहायला मिळते, त्याचप्रमाणे पावसाळ्यात त्वचेवर खाज येण्याची समस्या समोर येते. या समस्यांवर योग्य वेळी उपचार न केल्यास त्या वाढू लागतात.

3/9

घरच्या घरी उपाय

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

घरच्या घरी अशा काही गोष्टी करुन तुम्ही त्वचेच्या समस्या दूर करु शकता. असे केल्यास तुम्हाला त्वचेच्या समस्यांमध्ये खूप फायदा होईल. 

4/9

आंघोळीच्या पाण्यात टाका दूध

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

तुमच्या आंघोळीच्या पाण्यात एक ग्लास दूध टाका. याचा वापर केल्यास त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. यातून तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात याची माहिती घेऊया.

5/9

खाज सुटणे आणि जळजळ होणे

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

बदलत्या ऋतूत त्वचेला होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर आंघोळीच्या पाण्यात एक ग्लास दूध घाला. यामुळे तुमच्या शरीरावर होणाऱ्या रॅशेसपासून आराम मिळेल.

6/9

त्वचेवरील ओलावा

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

जर तुमच्या त्वचेवर आर्द्रता असेल तर याच्या वापराने तुमच्या त्वचेची आर्द्रता देखील दूर होईल. दुधामध्ये असलेले फॅट्स आणि प्रोटीन्स त्वचेला मुलायम बनवतात.

7/9

सनबर्नपासून मिळेल आराम

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

कडक उन्हाळ्यामुळे त्वचा जळते. यातून सुटका हवी असेल तर आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळा. यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल.

8/9

त्वचा चमकेल

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

आंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्यास तुम्हाला घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळेल. यामुळे तुमच्या शरीरावरील डागही दूर होतात.

9/9

अशा प्रकारे वापरा

Skin Glow Tips Put these things in bath water skin diseases will be removed get shiny skin

आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास कच्चे दूध घाला. यासोबत बादलीत दोन चमचे गुलाबजल आणि एक चमचा मध मिसळा. गरज वाटल्यास बादलीमध्ये खोबरेल तेलाचे दोन किंवा तीन थेंब घाला. याने आंघोळ केल्यानंतर कधीही साबण आणि फेसवॉश वापरू नका.