देशाचं बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती किती? पगार वाचून डोळे फिरतील

Nirmala Sitaraman Networth : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ष 2025 -26 साठी देशाचं बजेट सादर केलं. यात 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न असे अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले. अर्थमंत्री सीतारामण यांनी आतापर्यंत तब्बल 8 वेळा देशाचं बजेट संसदेत सादर केलं. तेव्हा देशाचं बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांची संपत्ती किती, तसेच त्यांना भारत सरकारकडून किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Feb 01, 2025, 15:49 PM IST
1/7

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काही दिवसांपूर्वीच झालेली लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. माझ्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसे नाहीत असं आश्चर्यकारक वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

2/7

राज्यसभेच्या नामांकनादरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2022 मध्ये निर्मला सीतारामण यांची एकूण संपत्ती सुमारे 2.53 कोटी रुपये होती. यामध्ये 1.87 कोटी रुपयांच्या स्थावर आणि 65.55 लाख रुपयांच्या जंगम मालमत्तेचा समावेश आहे. याशिवाय त्यांच्यावर 26.91 लाखांचे कर्ज आहे.

3/7

निर्मला सीतारमण यांची जंगम मालमत्ता :

वाहन: निर्मला सीतारमण यांच्याकडे एक बजाज चेतक स्कूटर असून याची किंमत 28,200 रुपये आहे. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यात 7,350 रुपये होते. सीतारामण यांच्या पीपीएफ खात्यात 1,59,763 रुपये आहेत. तसेच त्यांनी म्यूचुअल फंडमध्ये 5,80,424 रुपयांची गुंतवणूक केली आहे. निर्मला सीतारमण यांच्याकडे कोणतीही विमा पॉलिसी नाही. 

4/7

निर्मला सीतारामण यांची स्थावर मालमत्ता :

हैदराबादमध्ये निर्मला सीतारामण याचं घर असून त्याची एकूण किंमत 1,70,51,400 रुपये आहे. तसेच कुंतलूरमधील 17,08,800 लाखांची बिगरशेती जमीन आहे. 

5/7

निर्मला सीतारामण यांच्यावरील कर्ज :

राज्यसभेच्या नामांकनादरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2022 मध्ये निर्मला सीतारामण यांच्यावर एकूण 26.91 लाखांचं कर्ज होतं. यात गृह कर्ज 5,44,822 रुपये, ओवरड्राफ्ट  2,53,055 रुपये तर मॉर्गेज लोन जवळपास 18,93,989 रुपयांचं असतं.

6/7

निर्मला सीतारामण यांच्याकडील सोने चांदी :

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे जवळपास 315 ग्राम सोनं असून ज्याची किंमत जवळपास 19.4 ते 21.18 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच त्यांच्याकडे 3.98 लाख रुपयांची चांदी आहे. 

7/7

निर्मला सीतारामण यांचा पगार :

सरकारी आकडेवारीनुसार अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामण यांना महिन्याला 4,00,000 रुपये पगार दिला जातो.