Signature Analysis : तुमची स्वाक्षरी सांगेल तुमच्याबद्दल सगळं काही!, 'सही' च्या स्टाईलने ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव

प्रत्येकाची स्वाक्षरी किंवा सहीची एक स्टाईल असते. पण तुम्हाला माहितीये तुमची सही समोरच्याला तुमच्याबद्दल सगळं काही सांगून टाकते. 

| Dec 13, 2024, 16:26 PM IST
1/7

जे लोक सही करताना पहिलं अक्षर थोडं मोठं आणि नंतर पूर्ण नाव लिहितात. अशी लोक अद्भूत प्रतिभा असलेली मानली जातात. त्यांचामधील अजून एक गुण म्हणजे ते शक्तिशाली आणि मजबूत व्यक्तिमत्त्वाचे असतात.   

2/7

ज्या लोकांची सही खूपच लहान असते. ती लोक खूप स्वार्थी आणि इतरांवर नियंत्रण ठेवणारी असतात, असं म्हणतात. पण ज्या लोकांच्या सहीचा आकार अक्षरांपेक्षा मोठा असेल तर त्याला राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा असते.   

3/7

जे लोक आपल्या स्वाक्षरी वारंवार बदलतात असतात त्यांचा स्वभावही वारंवार बदलतात. जे लोक सुंदर आणि स्वच्छ सही करतात त्यांचा स्वभाव स्वच्छ आणि प्रेमळ असतो.   

4/7

जी लोक तळापासून वरपर्यंत सही करतात ते खूप महत्त्वाकांक्षी असतात. ही लोक कोणत्याही किंमतीत त्यांचं ध्येय साध्य करतात. तर जी लोक वेव्ह आकाराचे स्वाक्षरी करतात अशी लोक त्यांच्या कामात गोपनीयता ठेवतात.   

5/7

जर सहीचे पहिले अक्षर मोठे आणि उर्वरित सर्व अक्षरे समान असतील तर ती व्यक्ती खूप स्वाभिमानी असते असं म्हटलं जातं. जर स्वाक्षरीचे पहिलं अक्षर मोठे आणि शेवटचे अक्षर खूप लहान असेल तर अशी लोक कोणतेही काम मोठ्या उत्साहाने करतात. मात्र त्यांचं लवकरच त्या कामातील रस कमी होतो. अशी व्यक्ती कल्पनेत अधिक जगत असते. 

6/7

वरपासून खालपर्यंत सही करणारे लोक स्वभावाने निराशावादी असतात, असं मानलं जातं. जे लोक स्वाक्षरीच्या खाली रेषेवर एक बिंदू लावतात ते त्यांच्या वचनावर ठाम राहतात, असं म्हणतात. 

7/7

सरळ रेषेत सही करणारी व्यक्ती तटस्थ, प्रामाणिक, उदार आणि विश्वासार्ह असतात. असे लोक स्वभावाने साधे आणि शांत मानली जातात. ज्या लोकांची स्वाक्षरी खूप मोठी असते त्यांना खूप आत्मविश्वास असतो असं म्हटलं जातं. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)