किती प्रमाणात दारु प्यायल्यास Drunk & Drive मध्ये नाही अडकत तुम्ही? इंश्योरन्सवर काय होतो परिणाम?

भारतात दारू पिऊन गाडी चालवण्याबाबत कायदा काय सांगतो आणि त्याचा विमा दाव्यांवर काय परिणाम होतो हे समजून घेऊया.

Dec 13, 2024, 15:58 PM IST

Drunk & Drive: भारतात दारू पिऊन गाडी चालवण्याबाबत कायदा काय सांगतो आणि त्याचा विमा दाव्यांवर काय परिणाम होतो हे समजून घेऊया.

1/9

किती प्रमाणात दारु प्यायल्यास Drunk & Drive मध्ये नाही अडकत तुम्ही? इंश्योरन्सवर काय होतो परिणाम?

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

Drunken Driving Cases: कायद्यानुसार तुम्ही दारू पिऊन गाडी चालवू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे. पण किती प्रमाणात दारू पिऊन गाडी चालवण्याची परवानगी कायदा देतो? तुम्हाला माहिती आहे का? रक्तातील अल्कोहोल मात्रेची (BAC) ची मर्यादा काय आहे? अल्कोहोलच्या प्रभावाखाली असताना तुमचा अपघात झाला तर तुम्ही इन्श्योरन्ससाठी क्लेम करू शकता का?

2/9

प्रश्नांची उत्तरे

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

कार चालवताना असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. भारतात दारू पिऊन गाडी चालवण्याबाबत कायदा काय सांगतो आणि त्याचा विमा दाव्यांवर काय परिणाम होतो हे समजून घेऊया.

3/9

खासगी वाहन चालकांसाठी बीएसी मर्यादा

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

भारतात खासगी वाहन चालकांसाठी कायदेशीर बीएसी मर्यादा 0.03% (30 मिलीग्राम अल्कोहोल प्रति 100 मिली रक्त) आहे. तर व्यावसायिक वाहन चालकांसाठी ही मर्यादा शून्य आहे. 

4/9

रक्तातील अल्कोहोल सामग्री

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

म्हणजे वाहन चालवताना त्यांच्या रक्तात अल्कोहोल नसावे. तुमची BAC (रक्तातील अल्कोहोल सामग्री) कायदेशीर मर्यादेत असल्यास कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला तांत्रिकदृष्ट्या DUI (प्रभावाखाली वाहन चालवणे) मानले जात नाही.

5/9

मोटार विमा पॉलिसीं

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

असे असले तरी जेव्हा मोटार विमा पॉलिसींचा विचार केला जातो तेव्हा भारतातील बहुतेक पॉलिसी मग ते सर्वसमावेशक किंवा थर्ड पार्टी, सहसा "प्रभावाखाली वाहन चालवणे" या कलमाचा समावेश करतात.

6/9

विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

कायदा विशिष्ट प्रमाणात अल्कोहोल पिण्यास परवानगी देऊ शकतो. पण अपघाताच्या वेळी ड्रायव्हर अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली असल्याचे आढळल्यास कव्हरेज वगळणारे कलम विमा पॉलिसींमध्ये समाविष्ट असते.

7/9

विमा कंपनीचे कलम

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

याचा अर्थ असा की तुम्ही कायदेशीर बीएसी मर्यादेत असलात तरीही, अपघातात अल्कोहोलचा हातभार लावणारा घटक आढळल्यास विमा कंपनी तुमचा दावा नाकारू शकते. कारण तुम्ही कायदेशीर मर्यादेत असलात तरीही अल्कोहोल प्यायल्याने तुमच्या निर्णयावर, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे विमा कंपनीचे कलम सांगते.

8/9

1988 चा मोटार वाहन कायदा

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

1988 च्या मोटार वाहन कायद्यात दारू किंवा अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविल्यास शिक्षेची तरतूद आहे. अशात कोणी पकडले गेल्यास, दंड, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबन, आणि गंभीर अपघातांच्या प्रकरणांमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल होतो.

9/9

पोलिस अहवाल आणि पुराव्यांची मदत

Blood alcohol limit in Drunken Driving Cases Effect on Insurance Marathi News

पोलिसांच्या तपासात त्यांना आढळले की तुम्ही नशेत गाडी चालवताय, तर मग तुम्ही कायद्याच्या दृष्टीने कमी प्यायला असाल तरी तुमच्या इंश्योरन्स क्लेमवर परिणाम होऊ शकतो. कारण अपघातानंतर चालकाच्या शरिरात अल्कोहोल घटक होते की नाही हे ठरवण्यासाठी विमा कंपन्या अनेकदा पोलिस अहवाल आणि पुराव्यांची मदत घेतात.