'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'

Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...

Swapnil Ghangale | Jan 23, 2025, 12:40 PM IST
1/11

ranebalasaheb

माजी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंबदद्दल केलेली पोस्ट आज दिवसभर चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी नक्की काय म्हटलंय पाहूयात...

2/11

ranebalasaheb

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 99 वी जयंती आहे. त्यानिमित्त सोशल मीडियापासून ते मुंबईतील शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मारकासमोर जाऊनही अनेक मान्यवर बाळासाहेबांच्या स्मृतींना मानवंदना अर्पण करताना दिसत आहेत.  

3/11

ranebalasaheb

आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही, असं म्हणत नारायण राणेंनी आपल्या पोस्टला सुरुवात केली आहे.  

4/11

ranebalasaheb

बाळासाहेबांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे, असं म्हणत नारायण राणेंनी, "मी माझे आत्मचरित्र 'झंझावात'मधील एक उतारा उद्धृत करतो," असं म्हणत पुस्तकामधील एक उतारा लिहाला आहे.  

5/11

ranebalasaheb

"साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असून नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे," असं नारायण राणेंनी पुस्ताकातील उताऱ्याचा संदर्भ देत म्हटलं आहे.  

6/11

ranebalasaheb

"साहेब आणि माँसाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला," असंही नारायण राणे म्हणालेत.  

7/11

ranebalasaheb

"आजही मला विचारला की, या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे? तर मी बेधडकपणे 'बाळासाहेब ठाकरे' हेच नाव घेईन," असं नारायण राणे म्हणालेत.  

8/11

ranebalasaheb

"बाळासाहेब माझ्यासाठी माझं जग होते आणि राहतीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत, मी आज जो कोणी आहे त्यामागे त्यांचाच आशीर्वाद आहे. हे मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही," असं नारायण राणेंनी पोस्टच्या शिवटी म्हटलं आहे.

9/11

ranebalasaheb

नारायण राणेंनी सोशल मीडियावर केलेली हीच ती पोस्ट...

10/11

ranebalasaheb

नारायण राणेंना बाळासाहेबांनीच राज्याचं मुख्यमंत्री केलं होतं. 1996 साली पहिल्यांदा राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर आधी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणेंकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद सोपवण्यात आलेलं.  

11/11

ranebalasaheb

नारायण राणेंनी 2005 साली शिवसेनाला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये राणेंनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.