छत्रपती शिवरायांनी बांधलेला किल्ले रायगड 350 वर्षांपुर्वी कसा दिसत असेल? पाहा चित्रांच्या माध्यमातून...
Raigad killa Sketches: छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राजगडवरून रायगड ही स्वराज्याची राजधानी केली तेव्हा किल्ले रायगडवर साकार झाला भव्यदिव्य महाल. याच किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकही झाला. आज आपल्या लाडक्या महाराजांचा 350 वा राज्याभिषेक आहे तेव्हा त्यानिमित्तानं जाणून घेऊया की तेव्हाचा रायगड नक्की कसा दिसत असेल.
Raigad killa Sketches: आज रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेकदिन सोहळा (Shivrajyabhishek 2023) मोठ्या दिमाखात साजरा होतो आहे. परंतु इतक्या वर्षांपुर्वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून साकार झालेला रायगड त्यावेळी कसा दिसत असेल हा प्रश्न पत्येक मराठी मनाला पडणारा आहे. अनेक कलाकारांनाही आपल्या या कूतुहलाला वाट देत तो रायगड चित्रपटस्वरूपी साकार करण्याचा प्रयत्न पदोपदी केला आहे. असा एक प्रयत्न केला आहे कला दिग्दर्शक मदन माने यांनी. तेव्हा पाहुया त्यांच्या कल्पनेतून साकार झालेला चित्ररूपी सुंदर आणि अनोखा रायगड!