Mahashivratri 2024 : शिव-पार्वतीचं नातं जगातील पहिला प्रेम विवाह; नात्यातून पती- पत्नीला शिकता येतील 'या' गोष्टी
शंकर-पार्वती यांचा विवाह सोहळा दरवर्षी 'महाशिवरात्री' चा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दोघांचं लग्न हे जगातील पहिला प्रेम विवाह असल्याचं सांगण्यात येतं. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या नात्यातील खास गोष्ट.
महाशिवरात्री हा उत्सव महादेवाला समर्पित असलेला प्रमुख हिंदू सण आहे. शुक्रवारी 8 मार्च 2023 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षभरात 12 शिवरात्री आहेत. माघ किंवा फाल्गुन महिन्यातील शिवरात्री सर्वात शुभ मानली जाते आणि 'महाशिवरात्री' म्हणून ओळखली जाते. या दिवशी, वाराणसीतील काशी विश्वनाथ ते उज्जैनमधील महाकाल मंदिर ते ओडिशाच्या भुवनेश्वरमधील श्री लिंगराज मंदिरापर्यंत, हजारो भाविक भगवान शिव आणि त्यांची पत्नी मात पार्वतीची प्रार्थना करण्यासाठी देशभरातील शिव मंदिरांमध्ये गर्दी करतात. जगभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रत्येक भाविक शिवा-पार्वतीच्या मनोभावे आराधना करतात. शिव-पार्वती यांचं नातं हे जोडीदाराला कशी साथ द्यावी याचं उदाहरण आहे.
माता पार्वती आणि शंकराच अप्रतिम प्रेम

माता पार्वती आणि महादेव यांच्या अनोख्या प्रेमाची संपूर्ण जगाला जाणीव आहे. पार्वती आणि महादेव यांचा पहिला प्रेम विवाह असल्याचं सांगण्यात येतं. अशा अनेक पौराणिक कथा सुद्धा ऐकायला मिळतात जिथे स्वतः देवी-देवतांनी भोलेनाथांच्या प्रेमाचे वर्णन अमर्याद आणि अनन्य असे केले आहे. कदाचित त्यामुळेच महादेवाने माता पार्वतीला आपल्या अर्ध्या शरीरावर स्थान दिले आणि स्वतःला अर्धनारीश्वर म्हणवून घेतले. महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमाची आणि लग्नाची रंजक गोष्ट जाणून घ्या.
तेव्हा शंकराचं मन पाझरलं

देवी पार्वतीची तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. अगदी मोठमोठे पर्वत डगमगायला लागले. देवतांनीही मदतीसाठी शिवाकडे धाव घेतली. भोले बाबा देखील पार्वतीच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला दर्शन दिले आणि तिला राजकुमाराशी लग्न करण्यास सांगितले. पण पार्वती म्हणाली की तिने महादेवालाच आपला पती म्हणून स्वीकारलं आहे. आता ती त्यांच्याशिवाय इतर कोणाशीही लग्न करणार नाही. पार्वतीचे हे अपार प्रेम पाहून भोलेनाथने लग्नाला होकार दिला.
अनौखी वरात घेऊन पोहोचले

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव देवी पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत जगभरातील भूत-प्रेत होते. याशिवाय शिवाच्या मिरवणुकीत चेटकिणींचाही समावेश होता. त्यांनीच भोलेनाथाला भस्माने सजवले होते. अस्थींची हार घातली. ही अनोखी मिरवणूक पाहून राणी मैना देवी म्हणजेच माता पार्वतीची आई आश्चर्यचकित झाली. त्याने आपल्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिला.
आईचे मन वळवले

शिवाचे हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना लग्नाच्या परंपरेनुसार तयार होऊन येण्याची विनंती केली. यानंतर भोलेनाथने त्यांची विनंती मान्य केली आणि वराची वेशभूषा केली. राणी मैना देवी तिचे अनोखे सौंदर्य पाहून थक्क झाली. यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांचा विवाह विश्वाचे निर्माते श्री ब्रह्माजींच्या उपस्थितीत पार पडला. पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वतीच्या लग्नाच्या या तिथीला महाशिवरात्री म्हणतात.
महाशिवरात्र का महत्त्वाची

असे मानले जाते की महाशिवरात्रीला उपवास केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते आणि भगवान शिवासोबतच त्यांना माता पार्वतीचाही आशीर्वाद मिळतो. अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर मिळतो. यासाठी अविवाहित मुलींनी उपवास केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते. असे जाणकार सांगतात. पण या सोबतच प्रत्येकाने शिव-पार्वतीच्या नात्यातील एकतरी गोष्ट महाशिवरात्रीच्या दिवशी अंगिकारणे महत्त्वाची आहे.
प्रत्येकाने काय शिकावं?
