लग्नाच्या दिवशी सोनाक्षीच्या पतीसाठी शाहरुख खानची 'ही' कृती ठरली खास

नुकत्याच लग्न बंधनात अडकलेल्या सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची बरीच चर्चा होती. त्या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होते. त्यानंतर आता सोनाक्षीनं काही Unseen फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून त्यात तिनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा देखील उल्लेख केला आहे. 

| Jul 11, 2024, 08:29 AM IST
1/7

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिनं पहिल्या आणि दुसऱ्या फोटोसाठी कॅप्शन दिलं आहे की 'फिल्मी असण्यापासून आणि आपलं स्वत: चं म्यूजिक बनवण्यापर्यंत (2017 पासून), इथे आपल्या लग्नाचे फोटो क्लिक करण्यापर्यंत!!! हा पहिला फोटो माझा वॉलपेपर आहे.' 

2/7

तिसऱ्या आणि चौध्या फोटोविषयी बोलताना सोनाक्षी म्हणाली, 'हीरो त्याच्या हीरोईनला तिच्या स्वप्नातील भूमिकेसाठी तयार होताना पाहतोय आणि या सगळ्यात खूप शांती आहे. तर दुसरीकडे काही गंमत सांगत तो ही शांती भंग करतोय.'

3/7

पाचव्या फोटोविषयी सांगत सोनाक्षी म्हणाली, 'आपल्या आवडत्या शाहरुख खान (पहिल्या फोटोत पाहिलं तर लक्षात येईल) ची व्हॉईस नोट ऐकत. त्यानं आम्हाला दोघांना या महत्त्वाच्या दिवसासाठी खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या... मला वाटतं की झहीरसाठी या महत्त्वाच्या दिवसातील जर काही हायलाईट होणारं असेल तर ते हे आहे.' 

4/7

सहावा आणि सातव्या फोटोविषयी सांगत सोनाक्षी म्हणाली, 'तुम्ही कधी कोणत्या नवरी विषयी ऐकलंय का जी नवरदेवाच्या आधी तयार झालीये? नाही ना??? तर इथे तुम्ही ते पाहू शकता. नवरी देखील पहिल्यांदा स्वत: ला कुंक लावलेलं पाहून भावूक झाली आहे.' 

5/7

आठव्या फोटोविषयी सोनाक्षी म्हणाली, 'नवरी तयार झाली होती, त्यामुळे ती लांबून नवरदेवाला तयार होता पाहत त्याला न्याहाळत होती. मला आठवण आहे की मी वेडिंग फोटोग्राफर्सला म्हणाले की या सगळ्या क्षणांना फोटोत कैद करण्याचा विचार कोणत्या हुशार व्यक्तीच्या डोक्यात आला. मी तयार होत असताना त्यानं हे करायला नको होतं? हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी होकारात मान हलवली.' 

6/7

नवव्या आणि दहाव्या फोटोसाठी कॅप्शन देत ती म्हणाली, 'श्वास घेणं आणि ज्या घराला आम्ही एकत्र मिळून बनवू त्या घराच्या चारही बाजूंना फिरलो.' 

7/7

त्यानंतर '23 जुलै 2024 काय दिवस होता', असं अखेरीस सोनाक्षी म्हणाली.