मोठी अपडेटः Jab We Met 2 येतोय; पण या गोष्टीमुळे होणार प्रेक्षकांचा अपेक्षाभंग!

करीना कपूर आणि शाहीद कपूर यांचा 'जब वी मेट' चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, यात नवे चेहरे दिसणार असल्याची अफवा आहे. 

वनिता कांबळे | Sep 19, 2023, 17:21 PM IST

 Jab We Met 2 : अभिनेत्री करीना कपूर आणि शाहीद कपूर यांचा 'जब वी मेट' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. मात्र, Jab We Met 2 मध्ये  प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार आहे. ज्यांच्यामुळे हा चित्रपट हिट ठरला तेच या चित्रपटात दिसणार नाहीत.

 

1/7

  2007 साली रिलीज झालेल्या 'जब वी मेट' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 

2/7

Jab We Met 2 या चित्रपटात करीना कपूर आणि शाहीद कपूर यांची जोडी पहायला मिळणार नाही. अशा प्रकराचा कोणताच चित्रपट आम्ही करत नसल्याचे दोघांच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. तर, दिग्दर्शक या चित्रपटासाठी नविन चेहऱ्याच्या शोधात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेय. 

3/7

 करीना कपूर आणि शाहीद कपूर दोघेही संसारात रमले आहेत. अशातच  Jab We Met 2 च्या निमित्ताने दोघांना एकत्र पाहण्यास चाहते. उत्सुक आहेत. मात्र, प्रेक्षकांचा अपेक्षाभंग होणार आहे.   

4/7

 या चित्रपटानंतर करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या अफेरची चर्चा झाली. यानंतर त्याचे ब्रेकअपही झाले.   

5/7

रेल्वेत या दोघांची भेट होते. दोघांच्या लाईफमध्ये वेगवेगळे ट्विस्ट येतात अशा प्रकारे या चित्रपटाची स्टोरी पुढे सरकते.

6/7

या चित्रपटात करीनाने गीता नावाचे पात्र साकारले. गीता खूपच बिनधास्त दाखवलेय. तर, शाहीदने अदित्या नावाच्या तरुणाचे पात्र साकारले. 

7/7

करीनाचे जबरदस्त डायलॉग आणि प्रत्येक मूडला परफेक्ट मॅच होतील अशी गाणी यामुळेच हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता.