...तर मृत्यू अटळ! तरीही 'या' Black Sand Beach वर येतात हजारो पर्यटक; पाहा Photos

Black Sand Beach: या समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला स्तंभासारखे वाटणारे डोंगर आहेत. हा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक असला तरी फार मोठ्या संख्येनं दरवर्षी हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. हा किनारा नेमका कुठे आहे, त्याचं वैशिष्ट्यं काय आहे जाणून घेऊयात...

| Feb 10, 2024, 13:58 PM IST
1/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

आइसलॅण्डच्या दक्षिण किनारपट्टीवर असलेल्या राजधानीच्या रेक्जाविक शहरापासून 180 किलोमीटर दूर रेनिस्फजारा नावाचा समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे येथील रेती काळ्या रंगाची आहे. मात्र हा समुद्रकिनारा फार धोकादायक मानला जातो.  

2/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

काही लोकांच्या दाव्यानुसार या किनारपट्टीवर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मृत्यूचं सावट आहे. मात्र असं असतानाही फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी पर्यटक गर्दी करताना दिसतात. असं का हेच आपण जाणून घेणार आहोत.  

3/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेनिस्फजारा समुद्रकिनाऱ्यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये या समुद्रकिनाऱ्याच्या चहूबाजूला नेमकं काय दिसतं हे दाखवण्यात आलं आहे. तसे या किनारपट्टीवरील काळी रेती असलेला समुद्रकिनारा हा आइसलॅण्डमधील सर्वात धोकादायक किनारा मानला जातो.

4/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

'व्हिजीट आइसलॅण्ड डॉट कॉम'वरील माहितीनुसार, रेनिस्फराजा समुद्रकिनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा या फारच धोकादायक मानल्या जातात. या लाटांमुळे हा समुद्रकिनारा देशातील सर्वात धोकादायक किनारा आहे. या किनारपट्ट्यावर धडकणाऱ्या स्नीकर लाटा फारच शक्तीशाली असतात. या लाटा अचानक कुठेही निर्माण होतात आणि समुद्रकिनाऱ्यावर येऊन आदळतात. या लाटांचा असा नियोजित पॅटर्न ठरलेला नसल्याने त्या आपल्याबरोबर एखाद्याला घेऊन गेल्या तर त्याचा मृत्यू अटळ आहे असं समजलं जातं.

5/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

या धोकादायक स्निकर लाटांसंदर्भात इशारा देणारे अनेक बोर्ड या समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात आले आहेत. रेनिस्फजारा किनारपट्टी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेच्या नियमांकडे थोडंही दुर्लक्ष करु नका असा इशाराच दिला जातो. समुद्रकिनाऱ्यावरील फलकांवर लावण्यात आलेल्या सूचना वाचून त्या समजून घ्या. तसेच त्यांचे गांभीर्याने पालन करण्यास सांगितलं जातं. 

6/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

लाटांच्या तावडीत सापडू नये यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पाण्यात जाण्यापासून टाळावं असं सांगण्यात येतं. लहान मुलांना सोबत आणलं असेल तर अधिक सतर्क राहणे गरजेचं आहे, असंही सांगितलं जातं.  

7/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

हा समुद्रकिनारा अत्यंत धोकादायक असला तरी फार मोठ्या संख्येनं दरवर्षी हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देतात. काळी रेती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी हा समुद्रकिनारा जगभरात प्रसिद्ध आहे.  

8/8

Reynisfjara Black Sand Beach iceland Photos And Information in Marathi

या समुद्रकिनाऱ्याच्या पूर्वेला भल्या मोठ्या आकारातील बेसॉल्ट खडकापासून तयार झालेले स्तंभासारखे वाटणारे डोंगर आहेत. हे डोंगर फारच सुंदर दिसतात. मात्र या समुद्रकिनाऱ्यावर कायम एकप्रकारचं तणावपूर्ण वातावरण असतं.